जस्ट वेट अॅण्ड वॉच, पाकिस्तानच्या कांगाव्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांचे उत्तर
By Admin | Published: October 3, 2016 09:56 AM2016-10-03T09:56:59+5:302016-10-03T12:11:09+5:30
भारताच्या सर्जिकल स्ट्राईकबाबत शंका उपस्थित करत,याचा पुरावा उघड न केल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.यावर केंद्रीय गृहमंत्र्यंनी पाकिस्तानला 'जस्ट वेट अॅण्ड वॉच' असे उत्तर दिले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.3 - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक' केल्यानंतर पाकिस्तान पूर्णतः बिथरल्याचे दिसत आहे. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकबाबत शंका उपस्थित करत, याचा पुरावा उघड न केल्याचा आरोप देखील पाकिस्तानने केला आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला 'जस्ट वेट अॅण्ड वॉच' असे उत्तर दिले आहे. सर्जिकल स्ट्राईक करुन भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. मात्र, याचा पुरावा काय अशी विचारणा करत, भारताकडून सर्जिकल स्ट्राईक झालेच नाही, असा कांगावा पाकिस्तानकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यावरच राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला 'जस्ट वेट अॅण्ड वॉच' असा सबुरीचा सल्ला दिला आहे. या मोहिमेबाबतचा पुरावा भारतीय लष्कराने सरकाराकडे सुपुर्द केला आहे.
नवी दिल्लीतील 'स्वच्छ भारत' अभियानावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. देशासहीत संपूर्ण जगला सर्जिकल स्ट्राईकबाबत माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पाकिस्तानविरोधात भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे भरभरुन कौतुक देखील केले. याद्वारे संपूर्ण जगाला भारतीय सैनिकांची वीरता दिसून आली आहे, असे म्हणत त्यांनी मोहीम फत्ते करणा-या लष्करी अधिकारी आणि सैन्याचा गौरव केला.
आणखी बातम्या:
#WATCH A pigeon with a threat letter written in Urdu found at Simbal post by BSF in Pathankot, was later handed over to local police (Sep 2) pic.twitter.com/kF6ECcEkLC
— ANI (@ANI_news) October 3, 2016
तर, पाकिस्तानने त्यांच्या चॅनेल्सवर खोट्या चित्रफिती दाखवून कारवाईमध्ये भारतीय सैनिक मारले गेल्याचे वृत्त पसरवले आहे. पण, या चित्रफिती बनावट आहेत,तसंच यामध्ये भारतीय सैनिकांची प्राणहानी झालेली नाही, असे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे.