"पाकिस्तानात जा", बसायला जागा मागणा-या वयोवृद्ध मुस्लिमाला मिळालं उत्तर

By admin | Published: April 25, 2017 07:27 AM2017-04-25T07:27:18+5:302017-04-25T07:59:10+5:30

मेट्रोमध्ये बसण्यास जागा द्या अशी विनंती करणा-या एका वयोवृद्ध मुस्लीम व्यक्तीला पाकिस्तानात जा असं धक्कादायक उत्तर

Answer to veteran Muslim seeking a seat to go to Pakistan | "पाकिस्तानात जा", बसायला जागा मागणा-या वयोवृद्ध मुस्लिमाला मिळालं उत्तर

"पाकिस्तानात जा", बसायला जागा मागणा-या वयोवृद्ध मुस्लिमाला मिळालं उत्तर

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - मेट्रोमध्ये बसण्यास जागा द्या अशी विनंती करणा-या एका वयोवृद्ध मुस्लीम व्यक्तीला पाकिस्तानात जा असं धक्कादायक उत्तर मिळालं आहे. राजधानी दिल्लीमध्ये घडलेली ही घटना महिला हक्कासाठी लढणा-या कार्यकर्त्या कविता कृष्णन यांच्या फेसबुक पोस्टमुळे उघडकीस आली आहे.
 
दिल्लीतील जांभळ्या रंगाच्या मेट्रोमार्गावर हा प्रकार घडला आहे. एका वयोवृद्ध मुस्लीम व्यक्तीने बसण्यास जागा देण्याची विनंती दोन तरूणांना केली. त्यावर "जागा हवी असेल तर पाकिस्तानात जा" असं उत्तर त्या मुस्लीम व्यक्तीला देण्यात आलं. अरेरावी करणा-या तरूणांना शांत करण्याचा प्रयत्न मेट्रोतील संतोष रॉय या व्यक्तीने केला तर त्याच्यासोबतही त्या तरूणांनी हुज्जत घातली. अखेर खान मार्केट स्टेशनला गार्ड आल्यानंतर प्रकरण शांत झालं. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. 
 
याप्रकरणी पंडारा रोड पोलीस स्थानकात तक्रारही दाखल करण्यात आली होती. पण दोन दिवसांनंतर त्या वयोवृद्ध व्यक्तीने तक्रार मागे घेतली. अरेरावी करणा-या दोन्ही तरूणांनी लिखीत स्वरूपात माफी मागितल्याने तक्रार मागे घेतल्याचं त्या व्यक्तीने सांगितलं.  

Web Title: Answer to veteran Muslim seeking a seat to go to Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.