रेल्वेच्या सर्व समस्यांची उत्तरे एका क्लिकवर !

By admin | Published: January 11, 2017 01:20 AM2017-01-11T01:20:20+5:302017-01-11T01:20:20+5:30

रेल्वेच्या वेबसाइटवर प्रवाशांना नव्या सुविधा उपलब्ध करून देणारे अनेक महत्त्वाचे बदल नव्या वर्षात करण्यात येत आहेत. ट्रेन व प्रवासासंबंधी जी माहिती नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टिमवर यापूर्वी मिळायची

Answers to all problems of railways on one click! | रेल्वेच्या सर्व समस्यांची उत्तरे एका क्लिकवर !

रेल्वेच्या सर्व समस्यांची उत्तरे एका क्लिकवर !

Next

सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
रेल्वेच्या वेबसाइटवर प्रवाशांना नव्या सुविधा उपलब्ध करून देणारे अनेक महत्त्वाचे बदल नव्या वर्षात करण्यात येत आहेत. ट्रेन व प्रवासासंबंधी जी माहिती नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टिमवर यापूर्वी मिळायची, तिच्याविषयी अनेक तक्रारी होत्या. प्रवाशांना प्रसंगी चुकीची माहिती मिळायची.
त्यात आवश्यक ते बदल करण्याचे सहा महिन्यापूर्वी रेल्वेने ठरवले होते. आता नवे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून, रेल्वे मंत्रालयाला कम्प्युटर सॉफ्टवेअर उपलब्ध करून देणारी कंपनी ‘क्रिस’ला या सुधारणा करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे.
रेल्वे प्रवाशांनी सध्या आपले पीएनआर स्टेटस चेक केले तर त्यांना केवळ आपले आरक्षण सीट अथवा बर्थ ची स्थिती काय? याची माहिती वेबसाइटवर मिळते. यापुढे मात्र ही माहिती इतकी मर्यादित
नसेल. उत्तरादाखल येणारा संदेश आपला प्रवास, त्या रूटवरील साऱ्या माहितीसह आपल्याला सादर करण्यात येईल.
त्यात तुमच्या आरक्षणाचे स्टेटस काय? कोच नंबर कोणता, रेल्वे इंजिनापासून तो कितव्या क्रमांकावर, प्रवासात कोच बदलला असल्यास त्याची माहिती, ट्रेन वेळेवर आहे की उशिराने धावते आहे? ट्रेनचा वेग काय? नकाशावर ट्रेनच्या
ताज्या स्थानाची (लोकेशनची) स्थिती. ती कोणत्या वेळी कोणत्या स्थानकावर पोहोचेल याचा तक्ता, ट्रेनचे आगमन कोणत्या प्लॅटफॉर्मवर होईल? इत्यादी प्रश्नांची उत्तरे प्रवाशाला पीएनआर स्टेटस  चेक करताना, फक्त एका  क्लिकवर मिळणार आहेत. ही सुविधा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात येत असून, त्याची घोषणा बहुदा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रसंगी केली जाईल, असे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले.

नव्या बदलांमुळे अनेक समस्या दूर होणार


रेल्वे प्रवासाचे सहज आरक्षण मिळवणे आणि निर्धास्त होणे हा प्रवाशांसाठी कायमच मोठ्या डोकेदुखीचा विषय ठरत आला आहे. कितीही अगोदर तिकिट काढले तरी बहुतांश वेळेला ते वेटिंग लिस्टचेच असते.
चार्ट तयार झाल्यावर, प्रवासाला अवघे दोन तास उरले असताना, आरक्षण मिळाले की नाही, याचा उलगडा कसाबसा झाला तर धापा टाकीत प्रवाशांना रेल्वे स्थानकावर पोहोचावे लागते. आता यापैकी अनेक समस्या नव्या बदलांमुळे दूर होणार आहेत.

Web Title: Answers to all problems of railways on one click!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.