सीबीआयने घेतले एन्टोनी, नायर यांचे जबाब
By admin | Published: May 7, 2014 05:14 AM2014-05-07T05:14:27+5:302014-05-07T05:20:54+5:30
टाट्रा ट्रक खरेदी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) संरक्षण मंत्री ए.के. एन्टोनी आणि पंतप्रधानांचे तत्कालीन सल्लागार टी.के.ए. नायर यांचे बयान घेतले.
Next
>नवी दिल्ली : टाट्रा ट्रक खरेदी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) संरक्षण मंत्री ए.के. एन्टोनी आणि पंतप्रधानांचे तत्कालीन सल्लागार टी.के.ए. नायर यांचे बयान घेतले.
माजी लष्कर प्रमुख व्ही.के.सिंग यांनी या खरेदी व्यवहारासाठी आपल्याला एका सेवानिवृत्त लष्कर अधिकार्याने लाच देऊ केली होती, असा आरोप केला होता. त्यासंदर्भात सीबीआयने हे बयान नोंदवले आहे.
सीबीआय जवळपास दोन वर्षांपासून या प्रकरणाचा तपास करीत आहे. हे प्रकरण बंद किंवा आरोपपत्र दाखल करण्याबाबत लवकरात लवकर अंतिम निर्णय घेता यावा म्हणून सीबीआयने ॲन्टोनी आणि नायर यांचे बयान घेण्याचा निर्णय घेतला.
साक्षीदार म्हणून संरक्षणमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे माजी प्रधान सचिवांचे बयान घेण्यात आले, सीबीआयचे संचालक रंजित सिन्हा म्हणाले. यासंदर्भात सिन्हा यांना विचारणा करण्यात आली होती.
व्ही.के. सिंग यांनी आपल्या मिळालेल्या लाचच्या ऑफरची माहिती संरक्षण मंत्रालयाला सप्टेंबर २०१० मध्ये दिली होती, असे तक्रारीत म्हटले होते.
नायर यांचा टाट्रा खरेदी व्यवहार रद्द करण्यास विरोध असल्याचा आरोप सिंग यांनी केला होता. त्याप्रकरणी सीबीआयने नायर यांच्याकडे चौकशी केली होती.
प्रकरण काय आहे ?
सरकारी कंपनी बीईएमएलकडून १,६०० हून अधिक टाट्रा ट्रकचा पुरवठा करण्यास मंजुरी देण्यासाठी लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) तेजिंदरसिंग यांनी आपल्याला १४ कोटी रुपयांची लाच देऊ केली होती, असा आरोप माजी लष्करप्रमुख व्ही.के. सिंग यांनी केला होता. संरक्षण मंत्रालयाने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०१२ मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला. (वृत्तसंस्था)