लाल किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी तैनात होते अँटी ड्रोन सिस्टिम, विशेष व्यवस्थेसह झाले पंतप्रधान मोदींचे भाषण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 03:21 PM2020-08-15T15:21:26+5:302020-08-15T15:29:13+5:30
यावेळी पाहुन्यांमध्ये वरिष्ठ केंद्रीय मंत्री पहिल्या रांगेत बसले होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा समावेश होता.
नवी दिल्ली - 74व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी संरक्षण संस्थांनी चोख व्यवस्था केली होती. याचाच भाग म्हणून, किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी एक असे अँटी ड्रोन सिस्टिम तैनात करण्यात आले होते, जे छोट्यातील छोटा ड्रोन हल्लाही रोखू शकेल. ही सिस्टम तीन किमी अंतरात कुठलेही मायक्रो ड्रोन शोधण्यास आणि 1 ते 2.5 किमीच्या परिघात लेझरच्या सहाय्याने ते पाडण्यात सक्षम आहे. ही अँटी ड्रोन सिस्टिम डीआरडीओने तयार केली आहे.
यावेळी विशेष व्यवस्थेत पंतप्रधान मोदींचे भाषण -
यावेळी लाल किल्ल्यावर विशेष सुरक्षा व्यवस्थेत पंतप्रधान मोदांनी भाषण केले. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या सोशल डिस्टंसिंगसह स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरच्या (एसओपी) सर्व दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. यावेळी फार मोजक्या पाहुन्यांनाच आमंत्रण देण्यात आले होते. कोरोनामुळे पहिल्यांदाच यावेळी विद्यार्थ्यांना लाल किल्ल्यावर बोलावण्यात आले नव्हते. यापूर्वी लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाचे भाषण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलांमध्ये जाऊन त्यांना भेटत असत.
यावेळी लालकिल्ल्यावर पाहुण्यांच्या खुर्च्यांत सहा फुटांचे अंतर ठेवण्यात आले होते. प्रत्येक खुर्चीवर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. पाहुण्यांसाठी मास्क अनिवार्य करण्यात आले होते. यावेळी नेत्यांनीही हस्तांदोलन करण्याऐवजी दुरूनच एक मेकांना नमस्कार केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्टच्या दिवशी लाल किल्ला परिसरातील जवान स्वस्थ असावेत यासाठी त्यांना आधीपासूनच क्वारंटाइन करण्यात आले होते.
पाहुन्यांमध्ये वरिष्ठ केंद्रीय मंत्री पहिल्या रांगेत बसले होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, महिला तथा बाल विकास मंत्री स्मृति इरानी, भाडपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद हेदेखील यावेळी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!
CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!
Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी
CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस
CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर
कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा