देशविरोधी घटना सहन केल्या जाणार नाहीत - शिवराज सिंग चौहान

By admin | Published: February 27, 2016 09:37 PM2016-02-27T21:37:57+5:302016-02-27T21:37:57+5:30

जवाहलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यापीठात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नाराजी व्यक्त केली आहे

Anti-national incidents will not be tolerated - Shivraj Singh Chauhan | देशविरोधी घटना सहन केल्या जाणार नाहीत - शिवराज सिंग चौहान

देशविरोधी घटना सहन केल्या जाणार नाहीत - शिवराज सिंग चौहान

Next
>ऑनलाइन लोकमत - 
इंदोर, दि. 27 - जवाहलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यापीठात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा अर्थ आपण देशविरोधी घटनांमध्ये सामील होऊ शकतो असा नाही आहे असं शिवराज सिंग चौहान बोलले आहेत. 
 
ज्याप्रकाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतात आहे ते इतर देशातं कुठेही नाही. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशविरोधी घटनांना देश कधीही सहन करणार नाही असं मत शिवराज सिंग चौहान यांनी व्यक्त केलं आहे. भारत गेली अनेक दशक जगात शांततेचा संदेश देत आहे. मात्र देशातील काही लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या शिकवायला निघाले आहे, दुस-या कोणत्याही देशांत अशा देशविरोधी घोषणा सहन केल्या जात नाहीत असंही ते बोलले आहेत. 
 
मीर जाफर आणि जयचंदसारखे देशद्रोही याअगोदरही होते मात्र देशाने त्यांना स्विकार केलं नाही. गरज लागली तर भारतमातेच्या सन्मानार्थ आम्ही भारतीय आमच मुंडक छाटू मात्र कोणालाही त्याचा अपमान करु देणार नाही असे खडे बोलही शिवराज सिंग चौहान यांनी सुनावले आहेत. चित्रपट बनवतानेदखील या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे. आपल्या नव्या पिढीला नेमक कोणत्या दिशेला न्यायचं आहे हे चित्रपट बनवताना आपण ठरवल पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवराज सिंग चौहान यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Anti-national incidents will not be tolerated - Shivraj Singh Chauhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.