ओवेसींच्या सभेत देण्यात आल्या देश विरोधी घोषणा...? पोलीस तपासात समोर आलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 05:47 PM2022-04-14T17:47:36+5:302022-04-14T17:48:24+5:30

या व्हिडिओसंदर्भात, नंदपुरी भागात ओवेसी यांच्या उपस्थितीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या, असा दावा करण्यात येत होता. यानंतर आता, राजस्थान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास घेत, सत्य समोर आणले आहे.

Anti-national slogans in Asaduddin owaisi's meeting viral video, The truth came out in the rajasthan police investigation | ओवेसींच्या सभेत देण्यात आल्या देश विरोधी घोषणा...? पोलीस तपासात समोर आलं सत्य

ओवेसींच्या सभेत देण्यात आल्या देश विरोधी घोषणा...? पोलीस तपासात समोर आलं सत्य

Next

एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या जयपूर (Jaipur) दौऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओसंदर्भात, नंदपुरी भागात ओवेसी यांच्या उपस्थितीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या, असा दावा करण्यात येत होता. यानंतर आता, राजस्थानपोलिसांनी या प्रकरणाचा तपास घेत, सत्य समोर आणले आहे.

पोलीस तपासात समोर आलं सत्य - 
जेव्हा पोलिसांनी या व्हिडिओची तपासणी केली, तेव्हा तेथे ओवेसी साहब झिंदाबादच्या घोषणा दिल्याचे तज्ज्ञांच्या अहवालातून समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सभेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडिओंमध्ये आवाज स्पष्ट नसल्याने पाकिस्तानसंदर्भात घोषणा दिल्याचा संभ्रम निर्माण होत होता. काही लोक हे व्हिडिओ चुकीच्या तथ्यांसह व्हायरल करत होते.' अर्थात, पोलिसांच्या वक्तव्यानंतर हा Viral Video खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फेक पोस्ट करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई - 
यासंदर्भात बोलताना डीसीपी मृदूल कच्छावा म्हणाले, हा व्हिडिओ चुकीच्या तथ्यांसह पसरवणाऱ्यांविरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे. पत्रकारांसोबत बोलताना, कच्छावा म्हणाले, पोलिसांनी संबंधित दोन्ही व्हिडिओ अत्यंत बारकाईने तपासले आहेत. यात कुठलाही आक्षेपार्ह कंटेंट आढळलेला नाही. 

Web Title: Anti-national slogans in Asaduddin owaisi's meeting viral video, The truth came out in the rajasthan police investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.