नक्षलविरोधी मोहिमांत बदल करणार -सीआरपीएफ

By admin | Published: April 28, 2017 01:45 AM2017-04-28T01:45:37+5:302017-04-28T01:45:37+5:30

छत्तीसगडमध्ये सोमवारी झालेल्या नक्षली हल्ल्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) राज्याच्या दक्षिण बस्तर क्षेत्रातील

Anti-Naxal campaigns will be changed- CRPF | नक्षलविरोधी मोहिमांत बदल करणार -सीआरपीएफ

नक्षलविरोधी मोहिमांत बदल करणार -सीआरपीएफ

Next

नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये सोमवारी झालेल्या नक्षली हल्ल्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) राज्याच्या दक्षिण बस्तर क्षेत्रातील नक्षलविरोधी मोहिमांत बदल करणार असून, नक्षलवाद्यांविरुद्ध लवकरच मोहीम उघडली जाण्याची चिन्हे आहेत. २४ एप्रिल रोजी नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यातील बुर्कापाल गावाजवळ सीआरपीएफच्या तळावर केलेल्या हल्ल्यात २५ जवान शहीद झाले होते. सीआरपीएफचे काळजीवाहू महासंचालक सुदीप लखटकिया यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, आम्ही व्यूहरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही काही शिकलो आहोत. मी विवरण तर देऊ शकत नाही; परंतु एवढे निश्चित सांगू शकतो की, आम्ही सुरक्षा दलांची नव्याने तैनाती करणार असून, नक्षलविरोधी मोहिमांची संख्या आणि दर्जा वाढविणार आहोत.

Web Title: Anti-Naxal campaigns will be changed- CRPF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.