PoK मध्ये पाकिस्तानविरोधी नारेबाजी, स्वातंत्र्य देण्याची मागणी

By admin | Published: May 6, 2017 06:19 PM2017-05-06T18:19:32+5:302017-05-06T18:19:32+5:30

विद्यार्थ्यांनी पाकिस्तान सरकार आणि सेनेच्या अत्याचाराविरोधात जोरदार नारेबाजी केली तसंच स्वातंत्र्याची मागणी केली

The anti-Pakistan slogan in PoK, the demand for freedom | PoK मध्ये पाकिस्तानविरोधी नारेबाजी, स्वातंत्र्य देण्याची मागणी

PoK मध्ये पाकिस्तानविरोधी नारेबाजी, स्वातंत्र्य देण्याची मागणी

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - पाकिस्तानी सरकार आणि लष्कराकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील लोकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. हजिरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तान सरकार आणि सेनेच्या अत्याचाराविरोधात जोरदार नारेबाजी केली तसंच स्वातंत्र्याची मागणी केली. विद्यार्थी आपला संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरले होते. समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये विद्यार्थी स्वातंत्र्याच्या घोषणा करताना दिसत आहे. 
 
विद्यार्थ्यांनी यावेळी सरकार आणि लष्करावर जोरदार टीका केली. पाकिस्तान म्हणजे व्हाईट हाऊसमधून चालवण्यात येणारा देश असल्याचं यावेळी ते बोलले. व्हिडीओमध्ये विद्यार्थी घोषणा देताना दिसत आहेत की, "पाकिस्तानकडून स्वातंत्र्य घेणार, आमचा हक्क आहे स्वातंत्र्य, आम्ही का मागू नये स्वातंत्र्य". पाकिस्तानमध्ये हजारो मुलांचा कुपोषणाने मृत्यू होत असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. 
 
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नागरिक गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्ताकडून मुक्त करण्यात येण्याची मागणी करत आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील लोकांचा आरोप आहे की, गेल्या 21 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान नवाज शरिफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाने फसवणूक करत 41 पैकी 32 जागा जिंकल्या आहेत. 
 

Web Title: The anti-Pakistan slogan in PoK, the demand for freedom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.