शीखविरोधी दंगलीतील दोषीस रुग्णालयात न्या - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 03:02 AM2020-05-21T03:02:23+5:302020-05-21T03:02:42+5:30

न्या. मनमोहन आणि न्या. संजीव नरुला यांच्या पीठाने दोषी नरेश सहरावत याच्या याचिकेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या सुनावणीदरम्यान हा आदेश दिल्ली सरकार आणि विशेष तपास पथकास (एसआयटी) दिला.

Anti-Sikh riots convict taken to hospital - High Court | शीखविरोधी दंगलीतील दोषीस रुग्णालयात न्या - हायकोर्ट

शीखविरोधी दंगलीतील दोषीस रुग्णालयात न्या - हायकोर्ट

Next

नवी दिल्ली : १९८४ सालच्या शीखविरोधी दंगलीतील एका दोषीस तपासणीसाठी तीन दिवसांत आयएलबीएस रुग्णालयात घेऊन जाण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. त्याच्यावर यकृत आणि मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करायची आहे.
न्या. मनमोहन आणि न्या. संजीव नरुला यांच्या पीठाने दोषी नरेश सहरावत याच्या याचिकेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या सुनावणीदरम्यान हा आदेश दिल्ली सरकार आणि विशेष तपास पथकास (एसआयटी) दिला. सहरावत याच्या याचिकेवर २५ मेपर्यंत स्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. उपचारासाठी आपली शिक्षा तीन महिने निलंबित करण्याची विनंती सहरावत याने केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २६ मे रोजी होईल.

Web Title: Anti-Sikh riots convict taken to hospital - High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.