ISIS टेरर मॉड्युलविरोधात NIA ची मोठी कारवाई, 'या' राज्यात अनेक ठिकाणी छापे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:05 IST2025-01-28T11:04:28+5:302025-01-28T11:05:03+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी चेन्नई आणि मयिलादुथुराई जिल्ह्यात सर्च ऑपरेशन राबविण्यात येत आहे.

ISIS टेरर मॉड्युलविरोधात NIA ची मोठी कारवाई, 'या' राज्यात अनेक ठिकाणी छापे
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) इसिस(ISIS)दहशतवद्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. ISIS टेरर मॉड्यूलबाबत मिळालेल्या महत्त्वाच्या पुराव्यांवरून एनआयएने तामिळनाडूमधील २५ ठिकाणी छापे टाकले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी चेन्नई आणि मयिलादुथुराई जिल्ह्यात सर्च ऑपरेशन राबविण्यात येत आहे. २०२३ च्या कोइम्बतूर स्फोटाच्या चौकशीचा एक भाग म्हणून या सर्च ऑपरेशनकडे पाहिले जात आहे.
एनआयएच्या तपासात अरबी भाषा केंद्राचे नाव ठळकपणे पुढे आले आहे. या केंद्राशी संबंधित लोकांच्या विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत, जेणेकरून त्यांचे परदेशी दहशतवादी संघटनांशी कोणते संबंध आहेत, हे शोधता येईल.
जम्मू-काश्मीरमध्येही NIA ची कारवाई
दुसरीकडे, जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात एनआयएच्या पथकांनी दहशतवादी कट रचल्याप्रकरणी सहा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. श्रीनगर, बडगाम आणि सोपोरमध्ये हे छापे टाकले आहेत. माहितीनुसार, दहशतवादी कट रचल्याचा हा गुन्हा गेल्या वर्षी दाखल करण्यात आला होता.