'दहशतवादावर अतिशय कठोर कारवाई करा', अमित शहांचा देशातील सर्व तपास संस्थांना संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 09:04 PM2023-10-05T21:04:20+5:302023-10-05T21:04:37+5:30
Anti-terror Conference 2023: दहशतवादविरोधी परिषदेला संबोधित करताना गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेण्यास सांगितले.
Anti-terror Conference 2023: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी 2023 च्या दहशतवादविरोधी परिषदेला हजेरी लावली. यावेळी त्यांनी देशातील सर्व तपास संस्थांना दहशतवादविरोधी कारवायांमध्ये कठोर भूमिका घेण्यास सांगितले. फक्त दहशतवाद नाही, तर दहशतवाद्यांची संपूर्ण इको-सिस्टम नष्ट करावी लागेल, असं गृहमंत्री म्हणाले.
शहा पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे क्रिप्टोकरन्सी, हवाला, दहशतवादी वित्तपुरवठा, संघटित गुन्हेगारी टोळ्या आणि नार्को-दहशतवादाविरोधात कारवाय केल्या जात आहेत. सरकारच्या कठोर निर्णयांमुळे जम्मू-काश्मीर, नक्षलग्रस्त भाग आणि ईशान्येकडील हिंसाचार कमी करण्यात मोठे यश मिळाले आहे.
Chaired the 3rd Anti-terror Conference 2023 held by the @NIA_India in Delhi today.
— Amit Shah (@AmitShah) October 5, 2023
Stressed the need for anti-terror agencies to adopt a ruthless approach that not only destroys terror outfits but also the very ecosystem that breeds them. A proactive measure that prevents the… pic.twitter.com/NSvVqLi16j
गेल्या 5 वर्षात मोदी सरकारने अनेक मोठे डेटाबेस तयार केले आहेत. केंद्र आणि राज्याच्या सर्व यंत्रणांनी त्यांचा बहुआयामी वापर केला पाहिजे, तेव्हाच दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आपण यशस्वी होऊ. एनआयएने दहशतवादविरोधी संरचना तयार करावी. दहशतवादविरोधी एजन्सींची तपास रचना आणि SOPs आणि पदानुक्रम सर्व राज्यांमध्ये समान असले पाहिजेत. जेणेकरून केंद्र आणि राज्य संस्थांमध्ये चांगला समन्वय साधता येईल. आपल्याला एक समान प्रशिक्षण मॉड्यूल तयार करण्याच्या दिशेने काम करावे लागेल, जेणेकरुन दहशतवादाशी लढण्याच्या कार्यपद्धतीत एकसमानता येईल, असंही शहा म्हणाले.
शह पुढे म्हणतात, सर्व दहशतवादविरोधी एजन्सींना अशी कठोर भूमिका घ्यावी लागेल, जेणेकरुन नवीन दहशतवादी संघटना फोफावू शकणार नाहीत. आपल्याला फक्त दहशतवादाशी लढा देऊन चालणार नाही, तर त्यांची संपूर्ण इको-सिस्टीम देखील संपवावी लागेल. हे सर्व करण्यासाठी सरकार आणि आपण सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे.