अनुपम खेर झाला उपहासाचा विषय
By admin | Published: February 1, 2016 01:08 AM2016-02-01T01:08:50+5:302016-02-01T01:08:50+5:30
बॉलीवूडमधील अभिनेते अनुपम खेर सध्या सोशल साइट्सवर चर्चेचा विषय बनले आहेत. माणसाला आपल्या शब्दांत कसा शब्दच्छळ करावा लागतो, याचे ताजे उदाहरण म्हणजे अनुपम खेर. याची दोन कारणे आहेत.
लोकमत स्पेशल, अनुज अलंकार
बॉलीवूडमधील अभिनेते अनुपम खेर सध्या सोशल साइट्सवर चर्चेचा विषय बनले आहेत. माणसाला आपल्या शब्दांत कसा शब्दच्छळ करावा लागतो, याचे ताजे उदाहरण म्हणजे अनुपम खेर. याची दोन कारणे आहेत. पहिले कारण हे आहे की, मोदी सरकारने त्यांना पद्मभूषण दिले असून, दुसरे कारण हे आहे की, काही वर्षांपूर्वी याच अनुपम खेर यांनी या पुरस्कारांना ‘सरकारची चमचेगिरी’ या शब्दांत संबोधले होते. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनुपम खेर यांचे दोन टिष्ट्वट गाजत आहेत. एका टिष्ट्वटमध्ये ते या पुरस्कारावर टीका करीत असून, दुसऱ्या टिष्ट्वटमध्ये ते मोदी सरकारकडून मिळालेला पद्म पुरस्कार आपल्या जीवनातील सर्वात आनंदी दिवस असे संबोधून स्वत:ला धन्य मानत आहेत. अनुपम खेर यांच्याशिवाय मधुर भांडारकर आणि उत्तर प्रदेशच्या लोकगायिका मालिनी अवस्थी यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. अनुपम खेर यांच्यासह या दोघांनी असहिष्णुतेच्या प्रकरणी सरकारच्या बाजूने बिगुल वाजविला होता आणि दिल्लीत एक रॅलीही काढली होती. हे तिघेही मोदी सरकारच्या जवळचे असल्याने त्यांना हे पुरस्कार मिळाले यात संशय नाही. त्याचमुळे या तिघांवर सोशल मीडियातून टीकाटिप्पणीला सामोरे जावे लागत आहे.
त्यातही अनुपम खेर सर्वात जास्त चर्चेत आहेत. ही बाब त्यांना पद्म पुरस्कार मिळाला म्हणून नव्हे, तर एकेकाळी ते स्वत:ला गैरराजकीय व्यक्ती समजत होते.चित्रपट क्षेत्रात त्यांनी शानदार यश मिळविले आहे. मात्र, आता त्यांची दररोजची राजकीय वक्तव्ये पाहता एके दिवशी ते भाजपाचे अधिकृत सदस्य बनल्यास आश्चर्य वाटावयास नको. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपा त्यांना सिमला येथून उमेदवारी देण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. कदाचित त्यांना राज्यसभेवर घेतले जाण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनुपम खेर राजकारणात सामील होणे ही काही चूक नाही. त्यांना तो नागरी अधिकार आहे. त्याबद्दल कोणी सवालही उपस्थित करू शकत नाही. आणखी ते राजकीय नेते बनलेले नाहीत; पण राजकारणाच्या दलदलीत ते आपल्या विश्वासार्हतेला डाग लावून घेतील काय, असा सवाल निर्माण झाला आहे. येणारा काळच त्याचे उत्तर देईल. आता ते काहीही बोलले तरी ती बातमी होईल आणि सोशल मीडियावर चांगल्या-वाईट प्रतिक्रिया येतील हे मात्र निश्चित.