गौतम गंभीरने प्रसिद्धीचा हव्यास करू नये, 'त्या' ट्विटवरून अनुपम खेर यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 12:20 PM2019-05-29T12:20:10+5:302019-05-29T12:45:00+5:30
गुरुग्राममध्ये टोपी घातलेल्या एका मुस्लीम युवकाला टोपी काढून जय श्रीरामचे नारे देण्यास भाग पाडले होते. यावर गंभीरने प्रतिक्रिया दिली होती, की आपण धर्मनिरपेक्ष देशात राहतो. ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर कारवाई करावी, असंही गंभीरने म्हटले होते.
नवी दिल्ली - हरियाणातील गुरुग्राममध्ये अल्पसंख्याक समूहातील एका युवकाला झालेल्या कथित मारहाणीनंतर संतप्त झालेल्या खासदार गौतम गंभीर याने ट्विट केले होते. गंभीरच्या ट्विटवर रिट्विट करताना भाजपचे माजी खासदार अनुपम खेर यांनी गंभीरला प्रसिद्धीच्या मागे न पळण्याचा इशारा दिला आहे.
गंभीरच्या ट्विटवर रिट्विट करताना अनुपम खेर म्हणाले की, डिअर गौतम गंभीर लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी तुम्हाला शुभेच्छा. एक भारतीय असल्यामुळे तुमच्या विजयाचा मला आनंद आहे. तुम्हाला माझ्या सल्ल्याची गरज नाही. परंतु, तरी देखील प्रसिद्ध होण्यासाठी माध्यमांच्या जाळ्यात फसू नका. तुमचं कामच बोलणार असून वक्तव्य नाही, अशा शब्दांत खेर यांनी गौतम गंभीरला टोला लागवला.
“In Gurugram Muslim man told to remove skullcap,chant Jai Shri Ram”.
— Gautam Gambhir (@GautamGambhir) May 27, 2019
It is deplorable. Exemplary action needed by Gurugram authorities. We are a secular nation where @Javedakhtarjadu writes “ओ पालन हारे, निर्गुण और न्यारे” & @RakeyshOmMehra gave us d song “अर्ज़ियाँ” in Delhi 6.
गुरुग्राममध्ये टोपी घातलेल्या एका मुस्लीम युवकाला टोपी काढून जय श्रीरामचे नारे देण्यास भाग पाडले होते. यावर गंभीरने प्रतिक्रिया दिली होती, की आपण धर्मनिरपेक्ष देशात राहतो. ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर कारवाई करावी, असंही गंभीरने म्हटले होते.
Dear @GautamGambhir !! Congratulations on your win. As a passionate Indian it made me very happy. Not that you have asked for my advise but still- Don’t get into a trap of getting popular with a section of media. It is your work that will speak. Not necessarily your statements.🙏
— Anupam Kher (@AnupamPKher) May 28, 2019