अनुपम खेर यांना पाकिस्तानने व्हिसा नाकारला
By admin | Published: February 2, 2016 11:22 AM2016-02-02T11:22:20+5:302016-02-02T14:06:57+5:30
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर यांना पाकिस्तानने व्हिसा नाकारला आहे. येत्या पाच फेब्रुवारीला होणा-या कराची लिटरेचर फेस्टिव्हलला ते उपस्थित रहाणार होते.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर यांना पाकिस्तानने व्हिसा नाकारला आहे. येत्या पाच फेब्रुवारीला होणा-या कराची लिटरेचर फेस्टिव्हलला ते उपस्थित रहाणार होते. पाकिस्तानकडून व्हिसा न मिळणे दु:खद आणि निराशाजनक असल्याचे अनुपम यांनी म्हटले आहे.
कराची लिटरेचर फेस्टिव्हलसाठी पाकिस्तानने १८ पैकी १७ जणांना व्हिसा मंजूर केला मात्र मला एकटयाला व्हिसा नाकारला असे खेर यांनी म्हटले आहे. ६० वर्षीय अनुपम खेर यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
मी हिंदू आहे हे जाहीरपणे सांगायला मला भिती वाटते या अनुपम खेर यांच्या विधानावरुन मागच्या आठवडयात टि्वटरवरुन त्यांच्यात आणि काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यामध्ये शाब्दीक लढाई रंगली होती. त्याआधी असहिष्णूतेच्या मुद्यावरुन सुरु झालेल्या वादात त्यांनी जाहीरपणे नरेंद्र मोदी सरकारचे समर्थन केले होते.
दरम्यान, अनुपम खेर यांनी पाकिस्तानच्या या निर्णयाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मी भारताची अत्यंत समृद्ध अशा सहिष्णू परंपरेबद्दल बोलतो म्हणून की काश्मिरी पंडीत आहे आणि पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेले संबंध उघड करीन अशी भीती वाटते म्हणून मला व्हिसा नाकारला असा प्रश्नही खेर यांनी विचारला आहे. भारत पाकिस्तानी कलाकारांचं स्वागत करतो, आणि पाकिस्तान भारतीय कलाकारांना प्रवेश देत नाही, मुक्त संवादाची भीती का वाटते असेही खेर यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.
Didn't Pakistan Ministry of Foreign Affairs red flag my name to Pakistan High Commission in New Delhi? Why hide facts deliberately?
— Anupam Kher (@AnupamPkher) February 2, 2016
Pak High Commission shud know their own rules. #KarachiLitFest had given my name to authorities 1 month back & have my name in every poster.
— Anupam Kher (@AnupamPkher) February 2, 2016