पुरस्कारवापसी विरोधात अनुपम खेर यांचा राष्ट्रपती भवनावर मोर्चा
By Admin | Published: November 4, 2015 02:58 PM2015-11-04T14:58:28+5:302015-11-04T17:03:10+5:30
पुरस्कार वापसी ही राजकीयदृष्ट्या प्रेरीत असल्याची जाहीर टीका करणा-या अनुपम खेर यांनी ७ नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये मोर्चा काढण्याचे घोषित केले आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - पुरस्कार वापसी ही राजकीयदृष्ट्या प्रेरीत असल्याची जाहीर टीका करणारे अभिनेता अनुपम खेर यांनी ७ नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये मोर्चा काढण्याचे घोषित केले आहे. त्यांच्या या मोर्चामध्ये पुरस्कारवापसीला विरोध करणा-या अनेक बॉलीवूडमधल्या कलाकारांचा समावेश असेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
पुरस्कार वापसी ही भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलीन करण्यासाठी केलेले षडयंत्र असल्याची टीका खेर यांनी केली आहे. काँग्रेसने नुकताच दिल्लीमध्ये वाढत्या असहिष्णूतेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढला आणि राष्ट्रपतींना या घटनांची दखल घेण्याची विनंती केली होती. अनुपम खेरही आता पुरस्कारवापसी विरोधात मोर्चा काढणार आहेत. साहित्य व कला क्षेत्रामध्ये भाजपाविरोधी सूर चांगलाच उमटला असताना या मोर्चाच्या निमित्ताने भाजपाच्या मागे उभे राहणारे कोण आहेत, हे स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.