अनुराग ठाकूर यांनी केलं लोकसभेत व्हिडीओ रेकॉर्डिंग, आरोपानंतर काँग्रेसची कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 09:16 AM2017-07-25T09:16:27+5:302017-07-25T11:45:46+5:30
लोकसभेच्या कामकाजाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचा आरोप करत काँग्रेसनं भाजपा खासदार अनुराग ठाकुर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - लोकसभेच्या कामकाजाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचा आरोप करत काँग्रेसनं भाजपा खासदार अनुराग ठाकुर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. जमावाच्या मारहाणीमुळे झालेल्या हत्या प्रकरणांसंदर्भात संसेदत चर्चा सुरू होती. यादरम्यान झालेल्या गोंधळाचं अनुराग ठाकूर यांनी कथित स्वरुपात व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.
यासंदर्भात काँग्रेसचे सी. वेणुगोपाल यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना लिहिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, "संसेदच्या कामकाजाचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करणं याची नियमानुसार परवानगी नाही. याप्रकरणी आम्ही तात्काळ कारवाई करण्याची विनंती करत आहोत. भाजपा आपल्या बहुमताचा प्रचंड वापर करत असलं तरी काँग्रेस जनतेसंबंधी महत्त्वाचे मुद्दे मांडणं थांबवणार नाही."
काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांनीही कारवाईसाठी संसेदतील कामकाजाचे फुटेज तपासण्याची मागणी केली आहे. सुष्मिता असे म्हणाल्या आहेत की, भाजपा सरकार विरोधकांना वारंवार नियम सांगते असते. मात्र, भाजपा स्वतः याबाबत कोणतीही नैतिकता दर्शवत नाहीत.
आणखी बातम्या वाचा
यावेळी काँग्रेसकडून आम आदमी पार्टीचे खासदार भगवंत मान यांच्या प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला. मान यांच्याविरोधात संसदेमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंक केल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मान प्रकरणाचा दाखला देत संसदेतील नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी व सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोप करत काँग्रेसनं अनुराग ठाकूर यांच्याविरोधात तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.