ए.पी.भंगाळे ग्राहक आयोगाचे अध्यक्ष

By admin | Published: January 7, 2016 09:37 PM2016-01-07T21:37:43+5:302016-01-07T21:37:43+5:30

हॅलो १ साठी

AP Bhangale Chairman of the Consumer Commission | ए.पी.भंगाळे ग्राहक आयोगाचे अध्यक्ष

ए.पी.भंगाळे ग्राहक आयोगाचे अध्यक्ष

Next
लो १ साठी
जळगाव- माजी न्या.ए.पी.भंगाळे यांची राज्य शासनाच्या ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यासंबंधीचे आदेश अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ६ रोजी काढले. भंगाळे हे मूळचे जळगावकर आहे. १९८० मध्ये त्यांनी जळगावात वकिली सुरू केली. १९८८ मध्ये त्यांची नगर दिवाणी न्यायालय, मुंबई येथे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यांनंतर २००८ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. ते या पदावरून निवृत्त झाले आहे. आता त्यांची ग्राहक तक्रार निवारण आयोगावर नियुक्ती झाली.
स्नेह मेळावा
जळगाव- नूतन मराठा महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा १७ रोजी होणार आहे. १९७६ च्या पहिल्या बँचपासून ते २०१५ पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना बोलाविण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होईल. संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांनी केले आहे.
कथाकथन
जळगाव- अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळाच्या महिला महाविद्यालयात कथाकथन स्पर्धा झाली. बाहेती महाविद्यालयातील गोपीचंद धनगर यांनी सादरीकरण केले. दिवटी या कथेचे कथाकथन त्यांनी केले. प्राचार्य स.ना.भारंबे यांनी मार्गदर्शन केले. प्रकाश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. सुगंधा पाटील यांनी आभार मानले. प्रभावती महाजन यांनी सहकार्य केले.
चित्रकला स्पर्धा
जळगाव- ओम वधू वर केंद्रातर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ जानेवारीपर्यंत चित्र केंद्राच्या यश लॉन्सजवळील कार्यालयात पाठवावेत. ३१ रोजी पहिल्या तीन विजेत्यांना बक्षीस वितरण होईल.

भरत जाधव यांची भेट
जळगाव- युवाशक्ती फाउंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी अभिनेता भरत जाधव यांची शहरात भेट घेतली. शेतकरी व युवक यांच्यासाठी भविष्यात राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमाबाबत चर्चा झाली. या वेळी सुनील मंत्री, विराज कावडिया, मंजीत जांगीड, अमित जगताप, संदीप सूर्यवंशी, विनोद बावस्कर आदी उपस्थित होते.

Web Title: AP Bhangale Chairman of the Consumer Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.