मुलायम सिंह यादव यांच्या सुनेने दिले राम मंदिरासाठी ११ लाख; कारसेवकांबद्दल मोठे वक्तव्य
By देवेश फडके | Published: February 20, 2021 02:15 PM2021-02-20T14:15:48+5:302021-02-20T14:18:03+5:30
राम मंदिरासाठी संपूर्ण देशभरात देणगी गोळा करण्याच्या मोहिमेने अधिक व्यापक स्वरुप घेतले आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देशभर फिरून राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्याचे काम करत आहेत. यातच समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या धाकट्या सुनेने (Aparna Yadav) राम मंदिरासाठी ११ लाख रुपयांची देणगी दिल्याची माहिती मिळाली आहे.
लखनऊ :राम मंदिरासाठी संपूर्ण देशभरात देणगी गोळा करण्याच्या मोहिमेने अधिक व्यापक स्वरुप घेतले आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देशभर फिरून राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्याचे काम करत आहेत. यातच समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या धाकट्या सुनेने राम मंदिरासाठी ११ लाख रुपयांची देणगी दिल्याची माहिती मिळाली आहे. (aparna Yadav donates 11 lakhs for the construction of Ram Mandir in Ayodhya)
मुलायम सिंह यादव यांच्या धाकट्या सुनेचे नाव अपर्णा यादव (Aparna Yadav) असून, त्यांनी राम मंदिरासाठी ११ लाख रुपयांची देणगी दिली आहे. ''राम मंदिरासाठी स्वेच्छेने देणगी दिली आहे. माझ्या कुटुंबाने काय केले, याची जबाबदारी घेऊ शकत नाही. भूतकाळ कधीच भविष्यासमान नसतो, अशी प्रतिक्रिया अपर्णा यादव यांनी यावेळी दिली.
Aparna Yadav, daughter-in-law of Samajwadi Party leader Mulayam Singh Yadav, donates Rs 11 lakhs for the construction of Ram temple in Ayodhya.
— ANI UP (@ANINewsUP) February 20, 2021
"I have done it willingly. I cannot take responsibility for what my family has done. Past never equals the future," she said (19.02) pic.twitter.com/GLPBszcRzc
अवध प्रांताचे प्रचारक कौशल आणि कार्यवाह प्रशांत भाटिया माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांच्या निवासस्थानी राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी गेले होते. यावेळी अपर्णा यादव यांनी राम मंदिर उभारणीसाठी ११ लाख रुपयांची देणगी दिली.
इंधनदरवाढ होणार नाही, तो दिवस 'शुभ दिन' म्हणून घोषित करावा: प्रियंका गांधी
कारसेवकांवरील गोळीबार दुःखद
मुलायम सिंह यादव मुख्यमंत्री असताना अयोध्येत कारसेवकांवर झालेला गोळीबार दुःखद असल्याचे महत्त्वाचे वक्तव्य अपर्णा यादव यांनी यावेळी केले. ''त्यांनी आधी जे केले आणि ज्या परिस्थितीत हे सर्व घडले, ते दुःखद होते. यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही. जे घडले, ते आज बदलले जाऊ शकत नाही'', असे अपर्णा यादव यांनी सांगितले.
राम मंदिर उभारण्यावर भर
श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, राम मंदिर उभारण्यासाठी आतापर्यंत किती निधी जमा झाला, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. मात्र, एक हजार कोटी रुपये बँक खात्यात जमा झाले आहेत. अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यावर आमचा अधिकाधिक भर आहे, असे चंपत राय यांनी नमूद केले आहे.