'कंपन्यांच्या कामात मुद्दाम अडथळा आणतोय भारत', अॅप बंदीवरून चीन भडकला; आता दिली अशी धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 04:57 PM2020-07-28T16:57:15+5:302020-07-28T17:04:47+5:30
यापूर्वीही, चिनी कंपन्यांना, मंदीचा फायदा घेत भारतीय कंपन्यांचे अधिग्रहण करण्यापासून रोखण्यासाठी, भारत सरकारने काही कायदेशी नियम बनवले होते. तेव्हा चीनने डब्लूटीओमध्ये जाण्याची धमकी दिली होती.
नवी दिल्ली -भारतानेचीन विरोधात आर्थिक प्रतिबंध घालण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. यामुळे चीन अस्वस्त झाल्याचे दिसत आहे. भारताने सर्वप्रथम 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घातली. यानंतर यांचे क्लोन असलेल्या 47 अॅप्सवरही बंदी घालण्यात आली. एवढेच नाही, तर जवळपास आणखी 200 मोबाईल अॅप्सची यादीही भारताने तयार केली आहे. या अॅप्सना कुठल्याही क्षणी भारत बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. यामुळे आता चीनची अस्वस्थता अधिक वाढली आहे.
भारताने घेतलेल्या या भूमिकेवर नवी दिल्ली येथील चिनी दुतावासाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हे चिनी कंपन्यांच्या कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन असल्याचे दुतावासाने म्हटले आहे. एवढेच नाही, तर चिनी कंपन्यांच्या हिताच्या दृष्टीने सर्व प्रकारची आवश्यक ती पावले उचलली जातील, अशी धमकीही दुतावासाने दिली आहे.
यापूर्वीही, चिनी कंपन्यांना, मंदीचा फायदा घेत भारतीय कंपन्यांचे अधिग्रहण करण्यापासून रोखण्यासाठी, भारत सरकारने काही कायदेशी नियम बनवले होते. तेव्हा चीनने डब्लूटीओमध्ये जाण्याची धमकी दिली होती. यासंदर्भात जेव्हा विचारण्यात आले, तेव्हा चिनी दूतावासाच्या प्रवक्त्या शी रोंग म्हणाल्या, 'भारत सरकारने ज्या पद्धतीने वुई चॅटसह चीनच्या 59 अॅपवर बंदी घातली, ते चिनी कंपन्यांच्या कायदेशीर अधिकाराचे उल्लंघण आहे. आम्ही भारतासमोर आमचे म्हणणे ठेवले आहे. तसेच त्यांनी घेतलेल्या या निर्णयात सुधारणा करावी, असेही आम्ही म्हटले आहे. याशिवाय, चीन सरकारने आपल्या कंपन्यांना, त्या ज्या देशात काम करत असतील, त्या देशांच्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करावे, असे सांगितले आहे, असेही रोंग म्हणाल्या.
चीन आवश्यक ते पाऊल उचलेल - रोंग
'चिनी कंपन्यांचे कायदेशीर अधिकार, तसेच चीनी गुंतवणूकदारांसह आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या हितांचे बाजारातील नियमांप्रमाणे संरक्षण करणे, हे भारताचे कर्तव्य आहे. भारत आणि चीन यांच्यातील प्रायोगिक सहकार्य दोन्ही देशांच्या हिताचे आहे. मात्र, अशा प्रकारच्या हस्तक्षेपामुळे नुकसान होते आणि हे भारताच्या हिताचेही नाही,' असे रोंग यांनी म्हटले आहे. तसेच चीन आपल्या कंपन्यांच्या हिताच्या रक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेले, असेही रोंग यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
आई शप्पथ, एवढं बील! : भज्जीच्या घराचं वीज बील पाहून व्हाल अवाक; म्हणाला...
भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
भारताचा चीनवर दुसरा डिजिटल स्ट्राईक; एकाच झटक्यात पुन्हा 47 अॅप्सवर बंदी!