Parliament Session: संसदेत भज्जीचे जबरदस्त डेब्यू, पहिल्याच भाषणात सर्वांची मनं जिंकली; सभापतींनी केलं कोतुक, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 06:30 PM2022-08-03T18:30:05+5:302022-08-03T18:31:46+5:30

Harbhajan Singh in Rajyasabha: गुरुद्वारांवरील हल्ल्यांमुळे जगातील प्रत्येक शीख व्यक्तीची भावना दुखावली गेली. आम्हालाच का टार्गेट केले जात आहे? अशा प्रकारचे हल्ले आम्हाला अनेक प्रश्न उपस्थित करायला भाग पाडतात. हे हल्ले आमच्यावरच का? आम्हालाच का लक्ष्य केले जात आहे?

APP leader Harbhajan singh stunning debut in Parliament won everyone's hearts in the very first speech in Parliament Session | Parliament Session: संसदेत भज्जीचे जबरदस्त डेब्यू, पहिल्याच भाषणात सर्वांची मनं जिंकली; सभापतींनी केलं कोतुक, पाहा VIDEO

Parliament Session: संसदेत भज्जीचे जबरदस्त डेब्यू, पहिल्याच भाषणात सर्वांची मनं जिंकली; सभापतींनी केलं कोतुक, पाहा VIDEO

Next

आम आदमी पक्षाचे खासदार हरभजन सिंग यांनी आज राज्यसभेत शून्य प्रहरात अफगाणिस्तानचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानात शीख आणि गुरुद्वारांवर झालेल्या हल्ल्यांसंदर्भात भाष्य केले. एवढेच नाही, तर सरकारने याकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संसदेत बोलताना हरभजन सिंग हात जोडतानाही दिसून आले.

'शीखांच्या भावना दुखावल्या गेल्या' -
हरभजन सिंग म्हणाले, गुरुद्वारांवरील हल्ल्यांमुळे जगातील प्रत्येक शीख व्यक्तीची भावना दुखावली गेली. आम्हालाच का टार्गेट केले जात आहे? अशा प्रकारचे हल्ले आम्हाला अनेक प्रश्न उपस्थित करायला भाग पाडतात. हे हल्ले आमच्यावरच का? आम्हालाच का लक्ष्य केले जात आहे? हरभजन यांचे प्रश्न संपल्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्याचे कौतुक केले. यावर खासदारांनीही टाळ्यां वाजवून त्यांना दाद दिली.

कोरोना काळाची करून दिली आठवण -
हरभजन म्हणाले, कोरोना काळात गुरुद्वारांनी जगभरात ऑक्सिजनपासून ते औषधे आणि अन्नापर्यंत सर्व प्रकारच्या गरजा पुरवल्या. एवढेच नाही, तर देशाच्या स्वातंत्र्यापासून ते स्वातंत्र्यानंतरही शीख प्रत्येक क्षेत्रात आपले शौर्य, मेहनत आणि धैर्यासाठी ओळखले जातात. यामुळे आमच्या गुरुद्वारांवर होणारे हल्ले आम्हाला व्यथित करतात, असेही हरभजन म्हणाले.

काबूल येथील गुरुद्वाऱ्यात हल्ला -
हरभजन म्हणाले, 18 जूनला काबूलमध्ये गुरुद्वारा कार्ते परवनमध्ये हल्ला झाला. यात दोन जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. यापूर्वी 25 मार्चला रायसाहब गुरुद्वाऱ्यावर हल्ला झाला. दोन दिवसांनंतर याच गुरुद्वाऱ्यावर पुन्हा हल्ला झाला. या हल्ल्यांतही लोकांचा मृत्यू झाला. एवढेच नाही,  तर 1980 च्या दशकात दोन लाखहून अधिक हिंदू आणि शीख अफगाणिस्तानात हारत होते. मात्र, आता ही संख्या अत्यंत कमी झाली आहे.

हजारों शीखांचा गड होता... आता मूठभर राहिले आहेत... -
हरभजन सिंग संसदेत म्हणाले, अफगाणिस्तान कधीकाळी हजारो शीखांचा गड होता. अनेक दशकांच्या संघर्षामुळे ही संख्या कमी होऊन मूठभर उरली आहे. 1980 च्या दशकात अफगाणिस्तानात 2.20 लाख शीख आणि हिंदू राहत होते. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस हा आकडा 15 हजारवर आला. 2016 मध्ये 1350 वर आला आणि आता तेथे केवळ 150 शीखच उरले आहेत.

सभापतींनी केलं कौतुक -
हरभजन यांचे बोलणे संपल्यानंतर, सभापती व्यंकय्या नायडू म्हणाले, हरभजन सिंग आपण एक चांगला मुद्दा उपस्थित केला आहे. नायडू म्हणाले, हरभजन सिंग प्रसिद्ध क्रिकेटर आहेत. त्यांनी जो विषय उपस्थित केला तो अत्यंत महत्वाचा आहे. मला वाटते, की परराष्ट्रमंत्री याकडे नक्कीच लक्ष देतील.

Web Title: APP leader Harbhajan singh stunning debut in Parliament won everyone's hearts in the very first speech in Parliament Session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.