हा कसला चौकीदार ? - ओवेसींचा नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 07:36 PM2019-03-21T19:36:51+5:302019-03-21T20:30:50+5:30

एमआयएमचे अध्यक्ष असरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मै भी चौकीदार या कॅम्पेनवर जोरदार हल्लाबोल केला आहे. समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावं अशी मागणी ओवेसी यांनी केली आहे

appeal against aseemanand s acquittal if you are really a chowkidar says owaisi to modi | हा कसला चौकीदार ? - ओवेसींचा नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल

हा कसला चौकीदार ? - ओवेसींचा नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल

Next

हैदराबाद - एमआयएमचे अध्यक्ष असरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मै भी चौकीदार या कॅम्पेनवर जोरदार हल्लाबोल केला आहे. समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावं अशी मागणी ओवेसी यांनी केली आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी खरे चौकीदार असतील तर तर असीमानंदला निर्दोष ठरवणाऱ्या निर्णयाविरोधात सरकारने अपील करावं असा टोला ओेवेसी यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणावर कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात सरकारने तात्काळ त्याविरोधात वरच्या न्यायालयात याचिका करायला हवी होती, भारत-पाकिस्तानमध्ये दरम्यान चालणाऱ्या समझोता एक्सप्रेसमध्ये 18 फेब्रुवारी 2007 मध्ये हरयाणा येथील पानीपतजवळ बॉम्बस्फोट झाला होता. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला होता ते ठिकाण भारताच्या हद्दीतील शेवटचं ठिकाण होतं असंही ओवेसी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करताना एमआयएम प्रमुख ओवेसी यांनी सांगितले की, तुम्ही कसले चौकीदार आहात ? असीमानंदला आपण घाबरता कशाला ? असीमानंद एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निगडीत होता असा आरोप ओवेसी यांनी केला.

हरयाणा येथील पंचकुला येथे एनआयएच्या विशेष न्यायालयाने बुधवारी समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी असीमानंदसह ४ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. २००७ मध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटात ६८ जणांचा बळी गेला होता. यात बहुतांश पाकिस्तानी नागरिक होते. या देशाला चौकीदाराची नव्हे तर प्रामाणिक पंतप्रधानांची गरज आहे. जो संविधानाला मानतो, ज्याची भावना धर्मनिरपेक्ष, न्याय, बंधुत्व आणि स्वातंत्र्य अशी असायला हवी. पुलवामा, उरी आणि पठाणकोट एअरबेसवरील दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख करत त्यांनी या देशाला चौकीदार नव्हे तर एका प्रामाणिक पंतप्रधानाची गरज असल्याचे म्हटले. संविधानाला समजणारा देशाला पंतप्रधान हवा आहे असा टोला ओवेसी यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला.

जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी मसूद अजहरला संयुक्त राष्ट्रात आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात भारताला अपयश आले आहे. तोच धागा पकडत ओवेसी यांनी मोदी सरकारची ‘झोपाळा डिप्लोमसी’ अपयशी ठरल्याचा टोला लगावला. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीत आणलेल्या प्रस्तावाला चीनने विरोध केला होता. मागील वर्षी चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग हे अहमदाबादला शहराला भेट दिली होती.

Web Title: appeal against aseemanand s acquittal if you are really a chowkidar says owaisi to modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.