शहरात दोन शेतकरी बाजारांचा प्रस्ताव मनपास आवाहन : जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
By Admin | Published: April 26, 2016 12:16 AM2016-04-26T00:16:13+5:302016-04-26T00:16:13+5:30
जळगाव : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या संचालक मंडळाने राज्यात सर्व शहरांमध्ये शेतकरी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला असून जळगाव शहरात दोन शेतकरी बाजारांचा प्रस्ताव आहे. त्यासाठी मनपाने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मंडळातर्फे मनपास करण्यात आली आहे.
ज गाव : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या संचालक मंडळाने राज्यात सर्व शहरांमध्ये शेतकरी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला असून जळगाव शहरात दोन शेतकरी बाजारांचा प्रस्ताव आहे. त्यासाठी मनपाने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मंडळातर्फे मनपास करण्यात आली आहे. राज्य कृषि पणन मंडळाच्या संचालक मंडळाने राज्यात १०० शेतकरी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत पुणे शहरात २०, नागपूरमध्ये २, मुंबईमध्ये १ शेतकरी बाजार सुरू करण्यात आला आहे. तसेच औरंगाबाद शहरात २ शेतकरी बाजार सुरू करण्याची कार्यवाही अंतीम टप्प्यात आहे. कृषि पणन मंडळाने जळगाव शहरातही दोन शेतकरी बाजार सुरू करण्यासाठी मनपाने प्रमुख लोकवस्तीत सुमारे पाऊण ते १ एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. -------मंडळ देणार शेतकर्यांना मदतया शेतकरी बाजारात शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक सहकारी संस्थांनी यांनी उत्पादित केलेला भाजीपाला, फळे थेट ग्राहकांना योग्य दरात विक्री केली जाणार आहे. त्यासाठी शेतमाल विक्रीसाठी येणार्या शेतकर्यांना टेन्ट, ईलेक्ट्रॉनिक काटे, प्लास्टिक क्रेटस् आदी अर्थसहाय्य मंडळाकडून देण्यात येणार आहे.