होळीत कचरा न जाळण्याचे आवाहन

By Admin | Published: March 23, 2016 12:12 AM2016-03-23T00:12:07+5:302016-03-23T00:12:07+5:30

जळगाव : पर्यावरण संवर्धनासाठी होळीत लाकडांऐवजी कचरा जाळण्याचे आवाहन केले जाते. मात्र कचरा जाळल्यानेही प्रदुर्षण होते म्हणून होळीत कचरादेखील जाळू नये असे आवाहन सहयोग जनप्रबोधन आणि लोककल्याण संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Appeal to not burn Holi waste | होळीत कचरा न जाळण्याचे आवाहन

होळीत कचरा न जाळण्याचे आवाहन

googlenewsNext
गाव : पर्यावरण संवर्धनासाठी होळीत लाकडांऐवजी कचरा जाळण्याचे आवाहन केले जाते. मात्र कचरा जाळल्यानेही प्रदुर्षण होते म्हणून होळीत कचरादेखील जाळू नये असे आवाहन सहयोग जनप्रबोधन आणि लोककल्याण संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
कचरा जाळून होळी साजरी करणे हे देखील अयोग्य आहे. कारण कचर्‍यात हजारो विषारी घटक असतात. त्यात प्लास्टिक, खराब कपडे, रसायने, टायर, थर्माकॉल, चपला आदी प्रदुर्षण वाढविणारे घटकांचा समावेश आहे. कचर्‍यात या घटकांना जाळल्यास अतिशय विषारी वायु हवेत सोडले जातात व त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत असतो. तसेच होळीच्या दिवशी जीवंत झाडे तोडून जाळणे हे देखील अयोग्यच आहे.

Web Title: Appeal to not burn Holi waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.