तिकिटावरील सबसिडी सोडण्यासाठी रेल्वे करणार आवाहन
By admin | Published: July 6, 2017 06:36 PM2017-07-06T18:36:11+5:302017-07-06T18:36:11+5:30
धर्तीवर रेल्वे तिकिटावरील सबसिडी सोडण्याचं प्रवाशांना आवाहन करण्यात येणार आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - गेल्या काही दिवसांपूर्वीच स्वयंपाक गॅसवरील सबसिडी सोडण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं होतं. आता त्याच धर्तीवर रेल्वे तिकिटावरील सबसिडी सोडण्याचं प्रवाशांना आवाहन करण्यात येणार आहे. मात्र स्वयंपाकाच्या गॅससारखेच रेल्वे तिकिटावरील सबसिडी सोडणं हे प्रवाशांसाठी ऐच्छिक असणार आहे, असंही रेल्वेनं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
पुढच्या महिन्यापासून रेल्वेकडून नवी योजना लागू केली जाणार असून, योजनेंतर्गत 50 टक्के आणि 100 टक्के अशा दोन टप्प्यांमध्ये प्रवाशांना सबसिडी सोडता येणार आहे. रेल्वेला होणारी नुकसानभरपाई भरून निघावी, यासाठीच रेल्वेकडून असं आवाहन करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेला सद्यस्थितीत हजारो कोटींचा तोटा सहन करावा लागतोय. प्रवाशांनी ऑनलाइन आणि रेल्वे तिकीट खिडकीवरून बुकिंग करणाऱ्या तिकिटांवरील सबसिडी सोडल्यास रेल्वेला त्याचा फायदा होणार आहे.
मोदींच्या डिजिटल इंडिया या योजनेला डोळ्यांसमोर ठेवून रेल्वे प्रशासन हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणेच रेल्वेचा तोटा भरून काढण्यासाठी डायनामिक फेअर पद्धत अवलंब केला जाणार आहे. राजधानी, शताब्दी या रेल्वे गाड्यांमध्ये आधीपासूनच डायनामिक फेअर पद्धत लागू करण्यात आली आहे.
आणखी वाचा
(पश्चिम रेल्वेवरील प्रवास होणार सुसाट)
(ऑनलाइन रेल्वे तिकीट महागण्याची शक्यता)
ऑनलाइन रेल्वे तिकीट महाग होण्याची शक्यता आहे. इंडियन रेल्वेने अर्थमंत्रालयाकडे त्या संदर्भातील मागणी केली आहे. ऑनलाइन रेल्वे तिकीटांवर पुन्हा एकदा सर्व्हिस चार्ज लावण्याची मागणी इंडियन रेल्वेकडून करण्यात आली आहे. रेल्वे तिकीटांच्या ऑनलाइन बुकिंगवर आधीच अनेक पद्धतीने सूट दिली जाते आहे म्हणूनच रेल्वे तिकिटांवर देण्यात येत असलेली सर्व्हिस चार्जची सूट 30 जून नंतर स्थगित केली आहे. अर्थ मंत्रालयाकडून रेल्वेची ही मागणी स्वीकारली गेली तर ऑनलाइन तिकीट बूक करताना प्रवाशांना सर्व्हिस चार्ज द्यावा लागू शकतो.