सज्जन कुमार यांचे सुप्रीम कोर्टात अपील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 05:32 AM2018-12-23T05:32:39+5:302018-12-23T05:33:55+5:30
नोव्हेंबर १९८४ मध्ये दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगलींशी संबंधित एका खटल्यात जन्मठेप ठोठाविण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले.
नवी दिल्ली : नोव्हेंबर १९८४ मध्ये दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगलींशी संबंधित एका खटल्यात जन्मठेप ठोठाविण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले.
शिक्षा भोगण्यासाठी सज्जन कुमारना येत्या ३१ डिसेंबर रोजी हजर व्हायचे आहे. त्यासाठी आणखी महिनाभराची मुदत देण्यासाठी केलेला अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर लगेचच हे अपील केले गेले. तरीही सज्जन कुमार यांचे ३१ तारखेचे तुरुंगात जाणे टळेल, याची खात्री नाही. नाताळाच्या सुटीनंतर सर्वोच्च न्यायालय २ जानेवारीस सुरू होईल व त्याआधी सुटीकालीन न्यायाधीश या अपिलावर लगेच काही निर्णय करतील, अशी अपेक्षा नाही.
शिवाय अपिलात कोणताही एकतर्फी आदेश दिला जाऊ नये यासाठी दंगलीतील पीडितांनी ‘कॅव्हिएट’ही दाखल केले आहे.