पासासाठी हजर व्हा, नंतर परदेशात जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:54 AM2017-08-15T00:54:18+5:302017-08-15T00:54:25+5:30
सीबीआयकडे हजर होऊन आपला सदहेतू दाखवा आणि त्यानंतर हवे तर परदेशात जा, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांचे चिरंजीव कार्ती यांच्या ब्रिटनला जाण्याच्या मनसुब्यासवर अंकुश घातला.
शीलेश शर्मा ।
नवी दिल्ली : तपासासाठी निदान एकदा तरी सीबीआयकडे हजर होऊन आपला सदहेतू दाखवा आणि त्यानंतर हवे तर परदेशात जा, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांचे चिरंजीव कार्ती यांच्या ब्रिटनला जाण्याच्या मनसुब्यासवर अंकुश घातला.
चिदम्बरम वित्तमंत्री असताना कार्ती संचालक असलेल्या आयएमएक्स मीडिया कंपनीस लांच घेऊन परकीय गुंतवणुकीची परवानगी देण्यात आल्याच्या आरोपावरून सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे. २९ जून रोजी तपासासाठी बोलावूनही कार्ती
आले नाहीत म्हणून सीबीआयने त्यांच्याविरुद्ध विमानतळांवरील इमिग्रेशन विभगास ‘लूक
आऊट’ नोटीस काढली आहे.
कार्ती यांनी केलेल्या
याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयाने १० आॅगस्ट रोजी या नोटिशीला स्थगिती देत कार्ती यांना १६ आॅगस्ट रोजी ब्रिटनला जाण्याची मुभा दिली होती.
याविरुद्ध सीबीआयने केलेल्या अपिलावर सरन्यायाधीश न्या. जे. एस. खेहार व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल स्थगित केला. आता मद्रास न्यायालयाचा अंतिम निकाल होईपर्यंत थांबायचे की तसेच विदेशात जायचे, हे तुम्ही ठरवायचे आहे.
पण निदान एकदा
तरी तपासासाठी हजर झाल्याखेरीज तुम्ही जाऊ नये, असे आम्हाला
वाटते, असे न्यायमूर्तींनी त्यांना तोंडी सांगितले.