अॅपलने आणला आयफोन-६
By admin | Published: September 10, 2014 03:30 AM2014-09-10T03:30:05+5:302014-09-10T03:30:05+5:30
अॅपलने मंगळवारी रात्री बहुप्रतीक्षित आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस हे दोन नवे स्मार्टफोन लाँच केले. अॅपलचे सीईओ टिम कूक यांनी या स्मार्टफोनचे अनावरण केले
नवी दिल्ली : अॅपलने मंगळवारी रात्री बहुप्रतीक्षित आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस हे दोन नवे स्मार्टफोन लाँच केले. अॅपलचे सीईओ टिम कूक यांनी या स्मार्टफोनचे अनावरण केले.
आयफोन ६ मध्ये ४.७ इंचाचा डिस्प्ले असून आयफोन ६ प्लसमध्ये डिस्प्ले ५.५ इंच आकाराचा आहे. ज्या फ्लिंट सेंटरमध्ये अॅपलने पहिल्यांदा मॅकींटोष बाजारात आणला त्याच ठिकाणी या दोन्ही स्मार्टफोनचे लाँचिंग करण्यात आले.
फ्लिंट सेंटरमध्ये पुन्हा नवे उत्पादन घेऊन येताना आनंद होत आहे असे सांंगतानाच कूक यांनी आज आम्ही आयफोनच्या इतिहासात सर्वात मोठी तंत्रज्ञानाची भरारी घेतली आहे, असे उद्गार काढले. दोन फोन लाँच केल्यानंतर अॅपलचे सीईओ टिम कूक यांनी नवीन घड्याळही लाँच केली.