मान गए Apple! तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार; प्रकल्पच भारतात हलवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 02:00 PM2020-07-12T14:00:40+5:302020-07-12T14:03:48+5:30

कोरोना व्हायरसमुळे आधीच बिजिंग आणि वॉशिंग्टनमध्ये मोठे ट्रेड वॉर सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या युद्धाला आता आणखी वेग आला आहे. अ‍ॅपलने त्याच्या पुरवठादार कंपन्यांना चीनच्या बाहेर उत्पादन प्रकल्प हलविण्यास सांगितले आहे.

Apple shifting its production out from china; Taiwan's Foxconn expansion in india | मान गए Apple! तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार; प्रकल्पच भारतात हलवणार

मान गए Apple! तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार; प्रकल्पच भारतात हलवणार

Next
ठळक मुद्देफॉक्सकॉनचा हा निर्णय म्हणजे अ‍ॅपलचाच असण्याची शक्यता आहे.फॉक्सकॉनने श्रीपेरुंबदूर प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक करण्याची योजना बनविली आहे. सध्या इथे आयफोनचे एक्सआर मॉडेल बनविले जाते. ही गुंतवणूक पुढील तीन वर्षांमध्ये केली जाणार आहे.

नवी दिल्ली : भारत-चीन-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी येत आहे. ही बातमी तैवानची कंपनी फॉक्सकॉन (Foxconn) शी संबंधित आहे. ही कंपनी भारतातील प्रकल्प आणखी मोठा करण्याच्या तयारीला लागली आहे. हा प्रकल्प चेन्नईच्या पेरुबुदूरमध्ये आहे. यासाठी कंपनी एक अब्ज डॉलर म्हणजेच 7500 कोटी रुपये गुंतविणार आहे. महत्वाचे म्हणजे ही कंपनी अ‍ॅपलचे मोबाईल असेंबल करते.  (Apple shifting its production out from china) 


फॉक्सकॉनचा हा निर्णय म्हणजे अ‍ॅपलचाच असण्याची शक्यता आहे. कारण अ‍ॅपल चीनमधील उत्पादन दुसऱ्या देशात हलविण्याच्या तयारीला लागल्याचे सांगितले जात आहे. कोरोना व्हायरसमुळे आधीच बिजिंग आणि वॉशिंग्टनमध्ये मोठे ट्रेड वॉर सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या युद्धाला आता आणखी वेग आला आहे. अ‍ॅपलने त्याच्या पुरवठादार कंपन्यांना चीनच्या बाहेर उत्पादन प्रकल्प हलविण्यास सांगितले आहे. याचा परिणामही दिसू लागला असल्याचे एका सूत्राने रॉयटर्सला सांगितले आहे. 


फॉक्सकॉनने श्रीपेरुंबदूर प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक करण्याची योजना बनविली आहे. सध्या इथे आयफोनचे एक्सआर मॉडेल बनविले जाते. ही गुंतवणूक पुढील तीन वर्षांमध्ये केली जाणार आहे. फॉक्सकॉनद्वारा अ‍ॅपलचे जे अन्य मॉडेल चीनमध्ये बनविले जातात  ते आता भारतातच बनणार आहेत. तैवानच्या तैपेईमध्ये फॉक्सकॉनचे मुख्यालय आहे. फॉक्सकॉनच्या या पावलामुळे भारतात जवळपास 7000 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. कंपनीच्या आंध्रप्रदेशमध्येही प्रकल्प आहे. ज्यामध्ये कंपनी शाओमीसाठी स्मार्टफोन बनविते. 


गेल्या महिन्यातच संकेत दिलेले...
फॉक्सकॉनचे अध्यक्ष लिऊ योंग वे यांनी गेल्या महिन्यातच भारतात गुंतवणूक वाढविणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, अधिक माहिती दिली नव्हती. भारतात स्मार्टफोनच्या एकूण विक्रीचा 1 टक्के हिस्सा अ‍ॅपलकडे आहे. अ‍ॅपल ही जगातील दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन बनविणारी कंपनी आहे. अ‍ॅपल काही मॉडेल बंगळुरूमध्ये तैवानची आणखी एक कंपनी विस्ट्रॉन कॉर्पमधूनही असेम्बल करते. ही कंपनी आणखी एक प्रकल्प उभारणार असून आणखी अ‍ॅपलचे फोन यामध्ये बनविले जाणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

हद्द झाली! अनुकंपाखाली नोकरी दिली नाही; लॉकडाऊनमध्ये तरुणाने SBI ची हुबेहूब शाखाच उघडली

मोठा दिलासा! पुन्हा पुन्हा वापरता येणार N95 मास्क; केवळ 90 मिनिटांत 'चक्र डिकोव्ह' करणार निर्जंतुक

अमेरिका की आशिया, 'विश्वयुद्ध 2020' भडकल्यास कोण भिडतील? तज्ज्ञांनी लावले अंदाज

Ganeshotsav 2020 : यंदा सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करणार? सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

चीननेच कोरोनाची माहिती लपविली, WHO ही साथीला! आरोप करणाऱ्या महिला सायंटिस्टचे पलायन

परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार

Web Title: Apple shifting its production out from china; Taiwan's Foxconn expansion in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.