सिमी खटल्यात कलम वाढविण्याचा अर्ज

By Admin | Published: May 27, 2016 10:50 PM2016-05-27T22:50:09+5:302016-05-27T22:50:09+5:30

जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या सिमीच्या गुन्‘ाच्या खटल्यात आरोपींविरुध्द कट कारस्थान रचण्याचा कलम १२० ब वाढविण्याबाबत शुक्रवारी सरकार पक्षातर्फे न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. न्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात बाजू मांडताना जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी १२० ब हे कलम कायदेशीररीत्या महत्त्वाचे असल्याचा युुक्तिवाद केला. या अर्जावर ३१ मे रोजी निर्णय होणार आहे. या गुन्‘ात परवेज खान व आसिफ खान हे आरोपी आहेत. त्यापैकी आसिफ याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीतर्फे ॲड.सुनील चौधरी काम पाहत आहेत.

Application for extension of section in SIMI case | सिमी खटल्यात कलम वाढविण्याचा अर्ज

सिमी खटल्यात कलम वाढविण्याचा अर्ज

googlenewsNext
गाव : एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या सिमीच्या गुन्‘ाच्या खटल्यात आरोपींविरुध्द कट कारस्थान रचण्याचा कलम १२० ब वाढविण्याबाबत शुक्रवारी सरकार पक्षातर्फे न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. न्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात बाजू मांडताना जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी १२० ब हे कलम कायदेशीररीत्या महत्त्वाचे असल्याचा युुक्तिवाद केला. या अर्जावर ३१ मे रोजी निर्णय होणार आहे. या गुन्‘ात परवेज खान व आसिफ खान हे आरोपी आहेत. त्यापैकी आसिफ याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीतर्फे ॲड.सुनील चौधरी काम पाहत आहेत.

प्लॉट खरेदीच्या गुन्‘ात अटकपूर्व फेटाळला
जळगाव: मयत महिलेच्या जागी दुसरीच महिला उभी करुन प्लॉट स्वत:च्या नावावर खरेदी केल्याप्रकरणी दाखल फसवणुकीच्या गुन्‘ात आरोपी अरमान चिंधा पटेल (रा.रझा कॉलनी, जळगाव) व नीलेश सुभाष पाटील (रा.कुंभारीसिम, देवपिंप्री, ता.जामनेर) या दोघांचा अटकपूर्व अर्ज न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. संतोष मधुकर मुळे (रा.गजानन कॉलनी, जळगाव) यांच्या आईच्या नावावर असलेला तीन हजार चौरस फूट प्लॉट या दोघांनी खरेदी केल्याने त्यांच्याविरुध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयात दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारतर्फे ॲड.केतन ढाके यांनी काम पाहिले.

Web Title: Application for extension of section in SIMI case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.