गारपीट अनुदान मिळण्यासाठीचे अर्ज वर्ग जिल्हाधिकारी कार्यालय; ११४ अर्ज चौकशीसाठी पाठविले
By admin | Published: May 7, 2014 04:32 PM2014-05-07T16:32:16+5:302014-05-07T19:20:43+5:30
सोलापूर :
सोलापूर :
गारपीट पीक नुकसानीची रक्कम मिळाली नसल्याचे अर्ज दररोजच येत असून, जिल्हाधिकारी कार्यालयाला आलेले ११४ अर्ज त्या-त्या तहसील कार्यालयाला वर्ग करण्यात आले. याशिवाय तहसील कार्यालयाकडे आलेले अर्ज तपासणीसाठी वर्ग करण्यात आले.
२६ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान जिल्ात झालेल्या गारपीटमध्ये आमचेही नुकसान झाल्याचे अर्ज शेतकरी वैयक्तिक व एकत्रित करीत आहेत. हे अर्ज स्वीकारुन चौकशीसाठी पाठविले जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ३० एप्रिलपर्यंत असे वैयक्तिक ११४ शेतकर्यांचे अर्ज आले होते. ते तहसील कार्यालयाला वर्ग करण्यात आले. याशिवाय तहसील कार्यालयालाही शेतकरी अर्ज देत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाला १ मेपासून आलेले अर्जही त्या-त्या तहसील कार्यालयाला पाठविले जात असल्याचे सांगण्यात आले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील १०, उत्तर सोलापूर तालुक्यातील १५, बार्शीचे १६, अक्कलकोटचे ८, पंढरपूरचे १६, मोहोळचे २३, मंगळवेढ्याचे ५, सांगोला ३, माढ्याचे १५ तर माळशिरसच्या ३ शेतकर्यांचे अर्ज तहसील कार्यालयाला पाठविले आहेत.
चौकट
तहसीलमध्ये एकच गर्दी
उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात उत्तर सोलापूर तालुका तसेच शहरातील पडझडीच्या मदतीसाठी नागरिक हेलपाटे मारत आहेत. माझे नाव आले नाही, मला रक्कम एवढीच मिळाली, यादीत नाव आहे परंतु बँकेत पैसे जमा नाहीत, मी दिलेल्या अर्जांची चौकशी कधी होणार?, हे व अन्य प्रश्न घेऊन लोक उत्तर तहसील कार्यालयात गर्दी करु लागले आहेत. एकच कर्मचारी लोकांना उत्तरे देत काम करीत आहे.
--------
पडझडीचे ११ लाख बँकांत जमा
गारपीटसोबत झालेला अवकाळी पाऊस व वादळाने घरांचीही पडझड झाली होती. पडझडीसाठी उत्तर तहसील कार्यालयाने २४ लाख ९१ हजार २०० रुपयांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. त्यापैकी ११ लाख ६० हजार ६०० रुपये तहसील कार्यालयाला आले आहेत. ही रक्कम लाभार्थींच्या नावे बँकांना दिली आहे. याशिवाय गारपीट पीक नुकसान न मिळाल्याने मार्डी, बीबीदारफळ, कौठाळी, अकोलेकाटी, कारंबा, होनसळ, साखरेवाडी, राळेरास, नरोटेवाडी, गुळवंची, सेवालालनगर, हिरज, भोगाव, डोणगाव, बेलाटी, कवठे, रानमसले येथील अर्ज चौकशीसाठी दिले आहेत.