२८ वर्षांपूर्वी केला अर्ज, आता मिळाली नोकरी; सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला दिला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 07:44 AM2023-10-26T07:44:25+5:302023-10-26T07:45:54+5:30

उमेदवाराला अपात्र ठरविण्यासाठी चुकीचा निकष लावल्याचे सांगत काेर्टाने खडसावले.

applied 28 years ago got job now supreme court granted relief to the petitioner | २८ वर्षांपूर्वी केला अर्ज, आता मिळाली नोकरी; सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला दिला दिलासा

२८ वर्षांपूर्वी केला अर्ज, आता मिळाली नोकरी; सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला दिला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : टपाल विभागात नोकरीसाठी २८ वर्षांपूर्वी अर्ज केल्यानंतर बाद ठरलेल्या एका उमेदवाराला सुप्रीक कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर नियुक्तीपत्र मिळाले. उमेदवाराला अपात्र ठरविण्यासाठी चुकीचा निकष लावल्याचे सांगत काेर्टाने विभागाला खडसावले.

अंकुर गुप्ता या तरुणाने १९९५ मध्ये डाक सहायक पदासाठी अर्ज केला होता. नियुक्तीपूर्व प्रशिक्षणासाठी निवडही झाली होती. परंतु, बारावीची परीक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमातून पूर्ण केल्याचे सांगत त्याच्यासह अन्य काही उमेदवारांना बाद ठरविण्यात आले. याविरोधात गुप्ताने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणाकडे (कॅट) तक्रार केली. कॅटनेही डाक विभागाचा निर्णय चुकीचा ठरवला. डाक विभागाने दाखल केलेली पुनर्विचार याचिका  अलाहाबाद कोर्टानेे फेटाळली. त्याविरोधात विभागाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. अंकुर गुप्ता वय ५० वर्ष आहे. तो केवळ १० वर्षेच नोकरी करू शकतो. गुप्ता नोकरीचे लाभ मिळवू शकत नाही, मात्र तो पेन्शनसाठी दावा करू शकतो, असे सुप्रीम कोर्टाने निकाल देताना म्हटले आहे.

चुकीचा निकष 

न्या. बेला त्रिवेदी आणि न्या. दीपांकर दत्ता यांनी सुनावणीवेळी नोकरी देण्याचे आदेश दिले. एखाद्या उमेदवाराला अपात्र ठरविणे योग्य नाही.  उमेदवाराबाबत भेदभाव करण्यात आला आणि नोकरीपासून वंचित ठेवण्यात आल्याचे खंडपीठाने सांगितले.


 

Web Title: applied 28 years ago got job now supreme court granted relief to the petitioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.