संपूर्ण बिहारमध्ये दारूबंदी लागू

By admin | Published: April 5, 2016 01:40 PM2016-04-05T13:40:04+5:302016-04-05T16:00:28+5:30

संपूर्ण बिहार राज्यात १ एप्रिलपासून दारूबंदी लागू झाली असून फक्त देशी नव्हे तर विदेशी दारूवरही ही बंदी लागू झाली आहे.

Applied liquor in whole of Bihar | संपूर्ण बिहारमध्ये दारूबंदी लागू

संपूर्ण बिहारमध्ये दारूबंदी लागू

Next
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि, ५ - संपूर्ण बिहार राज्यात दारूबंदी लागू झाली असून फक्त देशी नव्हे तर विदेशी दारूवरही ही बंदी लागू झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी एप्रिल महिन्यापासून राज्यात दारूबंदीची घोषणा केली होती. त्यानुसार १ एप्रिलपासून राज्यात देशी दारूच्या निर्मितीस व विक्रीस बंदी घालण्यात आली. मात्र, चार दिवसांमध्येच महिला व लहान मुलांकडून जो प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला, त्यामुळे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरदेखील संपूर्ण बंदी घालण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे नितिशकुमारांनी सांगितले. गुजरात, नागालँड आणि मिझोरम पाठोपा बिहार हे 'ड्राय-स्टेट' बनले आहे. 
मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी आज याप्रकरणी माहिती दिली असून यापुढे कोणत्याही रेस्टॉरंट वा बारमध्ये दारू मिळणार नाही, तसेच दारूचा परवानाही देण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र आर्मी कँटीनमध्ये दारूची विक्री सुरूच राहील असेही त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे ताडीवरही बंदी घालण्यात आली असून केवळ नीरा विकता व पिता येईल असे सरकारने स्पष्ट केले आहे.

Web Title: Applied liquor in whole of Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.