११वीसाठी अप्लाईड मॅथेमॅटिक्स विषय; सीबीएसईचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 12:36 AM2020-04-02T00:36:31+5:302020-04-02T00:37:19+5:30

अप्लाईड मॅथेमॅटिक्स शिकणारे घेऊ शकतील कॉमर्स, इकॉनॉमिक्स आॅनर्समध्ये प्रवेश

Applied Mathematics Topics for 11th; The CBSE initiative | ११वीसाठी अप्लाईड मॅथेमॅटिक्स विषय; सीबीएसईचा पुढाकार

११वीसाठी अप्लाईड मॅथेमॅटिक्स विषय; सीबीएसईचा पुढाकार

googlenewsNext

- एस. के. गुप्ता 

नवी दिल्ली : सीबीएसईने ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा विषय अप्लाईड मॅथेमॅटिक्स सुरू केला. मंडळाने हा पुढाकार मानव संसाधन विकासमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्या आदेशावरून घेतला.

सीबीएसईच्या वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. या वर्षीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाला दोन पर्याय दिले होते. विद्यार्थ्याने एक तर बेसिक गणिताचा विषय निवडावा किंवा स्टँडर्ड गणित. याचा उद्देश असा की जे विद्यार्थी गणितात कच्चे आहेत त्यांना बेसिक गणिताच्या परीक्षेत उत्तीर्ण करावे. परंतु, त्यांना अकरावीत गणित विषय म्हणून मिळणार नाही.

पहिल्यांदा बोर्डाकडून हा पर्याय दिला गेला आहे की, दहावीची बेसिक गणिताची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थ्याने पुढील दहावीच्या कंपार्टमेंट परीक्षेत स्टँडर्ड गणिताची परीक्षा द्यावी व उत्तीर्ण झाल्यावर ११वीत गणित विषय तो घेऊ शकेल. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाले की, बोर्डने सुरू केलेल्या अप्लाईड मॅथेमॅटिक्स विषयाचा कोड २४१ आहे. यावर्षी परीक्षेत विद्यार्थ्यांनी बेसिक गणित विषय निवडला आहे.

हा नवा विषय त्यांच्या रुचीनुसार कॉमर्स, इकॉनॉमिक्स व समाजशास्त्राच्या गरजा लक्षात घेऊन बनवला. त्याआधी दहावीत बेसिक गणित विषय घेणाऱ्यांना ११ वीत गणित विषय न शिकण्याचा पर्याय होता. परंतु, नॅशनल करीकुलम फ्रेमवर्क-२००५ च्या शिफारशींत असे म्हटले आहे की, बेसिक गणित व स्टँडर्ड गणिताची डिझाईन केली गेली आहे.

आता दहावीत बेसिक गणित शिकणारे विद्यार्थी अकरावीत अप्लाईड गणित घेऊ शकतील. त्याच्या आधारावर ते कॉमर्स आणि अर्थशास्त्र शिकू शकतील. अकरावीत पूर्वीप्रमाणेच गणित शिकणारे विद्यार्थी विज्ञानाचे शिक्षण घेऊन पुढे विद्यापीठ स्तरावर गणित आॅनर्स व इंजिनियरींगचे शिक्षण घेऊ शकतील. परंतु, अप्लाईड मॅथेमॅटिक्स शिकणारे विद्यार्थी इंजिनियरींग व गणित आॅनर्सचे शिक्षण घेऊ शकणार नाहीत. ते कॉमर्स व इकॉनॉमिक्स आॅनर्सचे शिक्षण घेऊ शकतील.

विद्यार्थ्यांच्या तर्कशक्तीसाठी...

च्सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी सांगितले की, दहावीत बेसिक गणिताचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांकडे पुढे गणित शिकण्याचा पर्याय नव्हता. अशा स्थितीत जे विद्यार्थी वाणिज्य किंवा अर्थशास्त्राचे शिक्षण घेतात, त्यांची तर्कशक्ती वाढविणे गरजेचे होते. त्यांच्यासाठी नवीन गणित विषय तयार केला जावा, हा विचार पुढे आला.

च्तीच बाब लक्षात घेऊन बोर्डाने अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अप्लाईड मॅथेमॅटिक्स विषय सुरू केला आहे. एखादा विद्यार्थी असा विचार करीत असेल की, अकरावी किंवा बारावीच्या वर्गात तो दोन्ही प्रकारचे गणित विषयाच्या रूपाने घेऊ शकतो, तर ते चुकीचे आहे. कारण विद्यार्थी एकाच प्रकारचे गणित शिकू शकतो.

च्स्टँडर्ड गणित शिकावे की, अप्लाईड मॅथेमॅटिक्स, याची निवड त्या विद्यार्थ्याने करावी; परंतु दहावीच्या बेसिक गणित विषयात उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना केवळ अप्लाईड मॅथेमॅटिक्स शिकण्याचा पर्याय शिल्लक असेल. बेसिक गणित विषयात उत्तीर्ण झालेला विद्यार्थी स्टँडर्ड गणित शिकू इच्छित असेल, तर त्याला कंपार्टमेंट परीक्षेमध्ये स्टँडर्ड गणित विषय उत्तीर्ण करावा लागेल.

फक्त २९ विषयांचीच परीक्षा घेतली जाणार

च्कोरोना विषाणू उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर व शिक्षणाचे भवितव्य लक्षात घेऊन सीबीएसई दहावी आणि बारावीची परीक्षा फक्त मुख्य २९ विषयांचीच घेणार आहे, असे सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी सांगितले.

च्हे विषय प्रमोशनसाठी आणि उच्चशिक्षणाच्या संस्थांत प्रवेशासाठी महत्वाचे आहेत. इतर विषयांची सीबीएसई परीक्षा घेणार नाही त्यांचे मार्किंग व मूल्यमापनाबाबत स्वतंत्र सूचना दिल्या जातील. बोर्ड जेव्हा २९ विषयांची परीक्षा घेऊ शकेल तेव्हा ती नोटीस देऊन घेतल्या जातील, असे निशंक म्हणाले.

Web Title: Applied Mathematics Topics for 11th; The CBSE initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.