माधुरी सादरेंचा वारस लावण्यासाठी अर्ज
By admin | Published: November 5, 2015 11:29 PM2015-11-05T23:29:19+5:302015-11-05T23:29:19+5:30
जळगाव: दिवंगत पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी तत्कालिन पोलीस अधीक्षक एस.जयकुमार यांच्याविरुध्द दाखल केलेल्या दोन कोटी रुपयांच्या अबु्र नुकसानीच्या दाव्यात वारस म्हणून त्यांची पत्नी माधुरी सादरे यांचे नाव लावण्यात यावे असा अर्ज त्यांचे वकील विजय दाणेज यांनी गुरुवारी न्यायालयात दाखल केला. न्या.आर.एस.भाकरे यांच्या न्यायालयात हा खटला सुरु आहे. बोदवड येथे कार्यरत असताना सादरेंना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर मॅट कोर्टाने हे निलंबन रद्द केले होते. जयकुमार यांनी निलंबनाबाबत बदनामी केली म्हणून सादरे यांनी त्यांच्याविरुध्द दोन कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला होता. आता या खटल्यात ८ डिसेंबर रोजी कामकाज होणार आहे.
Next
ज गाव: दिवंगत पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी तत्कालिन पोलीस अधीक्षक एस.जयकुमार यांच्याविरुध्द दाखल केलेल्या दोन कोटी रुपयांच्या अबु्र नुकसानीच्या दाव्यात वारस म्हणून त्यांची पत्नी माधुरी सादरे यांचे नाव लावण्यात यावे असा अर्ज त्यांचे वकील विजय दाणेज यांनी गुरुवारी न्यायालयात दाखल केला. न्या.आर.एस.भाकरे यांच्या न्यायालयात हा खटला सुरु आहे. बोदवड येथे कार्यरत असताना सादरेंना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर मॅट कोर्टाने हे निलंबन रद्द केले होते. जयकुमार यांनी निलंबनाबाबत बदनामी केली म्हणून सादरे यांनी त्यांच्याविरुध्द दोन कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला होता. आता या खटल्यात ८ डिसेंबर रोजी कामकाज होणार आहे.सागरच्या वकीलांनी मागितली युक्तीवादासाठी वेळसागर चौधरी याच्या फिर्यादीवरुन अशोक सादरे यांच्याविरुध्द खंडणी व धाक दाखविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणतीही चौकशी न करता न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे चौकशी करुन हा गुन्हा रद्द करावा यासाठी ॲड.विजय दाणेज यांनी फौजदारी खटला दाखल केला आहे. न्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयात हा खटला सुरु आहे. गुरुवारी सागरचेे वकील बिपीन पाटील यांनी या खटल्यात युक्तीवाद करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितली. त्यानुसार न्यायालयाने या खटल्यातही ८ डिसेंबर ही तारीख ठेवली आहे. याच दिवशी सादरे यांच्यावतीने प्रतिनिधी हजर ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.आंदोलनाची परवानगी देण्यात टाळाटाळअशोक सादरे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत धरणे आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनासाठी परवानगी मागायला गेलेल्या दीपक गुप्ता यांना जिल्हा पेठ पोलिसांनी परवानगी देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक शाम तरवाडकर हे त्यांना अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्याकडे घेवून गेले. तेथे झालेल्या चर्चेत गुप्ता यांना परवानगी देण्यात आली.