सैन्यात वन रँक वन पेन्शन लागू करा - राहुल गांधी
By Admin | Published: October 30, 2016 02:07 AM2016-10-30T02:07:20+5:302016-10-30T02:07:20+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून भारतीय जवानांविषयी आदर व्यक्त करतानाच, लष्करात वन रँक वन पेन्शन हे
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून भारतीय जवानांविषयी आदर व्यक्त करतानाच, लष्करात वन रँक वन पेन्शन हे तत्व लागू करावे, अशी मागणी केली आहे.
जवानांना खा. राहुल गांधी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत मात्र आजी आणि माजी सैनिकांना वन रँक, वन पेन्शन लागू केली, तरच त्यांच्या कार्याविषयी आपण सारे कृतज्ञ आहोत, असे म्हणता येईल, असा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.
पत्रात राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये आपण आपल्या जवानांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई, अपंगत्व आल्यास पेन्शन हे फायदे मिळायलाच हवेत.
मोदी चीनच्या सीमेवर इंडो-तिबेटिअन बॉर्डर फोर्सच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. दिल्लीहून वायुसेनेच्या विशेष विमानाने गौचर येथे पोहोचणार आहेत. त्यावेळी एमआय-१७ हेलीकॉप्टर त्यांच्यासोबत असेल. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हेही पंतप्रधान मोदी यांच्यासह असणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)