निवड होऊनही नियुक्तीसाठी वणवण

By Admin | Published: January 19, 2017 05:46 AM2017-01-19T05:46:23+5:302017-01-19T05:46:23+5:30

पोलीस शिपाई भरतीत निवड होऊनही लाल फितीच्या कारभारामुळे वाशिमच्या तरुणाची गेली दोन वर्षे वणवण सुरू आहे.

Appointment for appointment | निवड होऊनही नियुक्तीसाठी वणवण

निवड होऊनही नियुक्तीसाठी वणवण

googlenewsNext


मुंबई : पोलीस शिपाई भरतीत निवड होऊनही लाल फितीच्या कारभारामुळे वाशिमच्या तरुणाची गेली दोन वर्षे वणवण सुरू आहे. नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असतानाच, गृह विभागाने राज्यातील जिल्ह्यांतील अशी दप्तर दिरंगाईच्या प्रकरणाची माहिती मागविली आहे. या माहितीनंतर एकदंरीत प्रकरणे मार्गी लावणार आहे. नियुक्तीचे स्वप्न आणखीन लांबणीवर गेल्याने याउमेदवाराच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे न्याय मिळणार की नाही? असा प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभा आहे.
वाशिम जिल्ह्याच्या वरुड खुर्दमध्ये राहणारा विठ्ठल सीताराम सुर्वे. वृद्ध आईवडील आणि गतिमंद भावाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. पार्ट टाईम नोकरी करून शिक्षण पूर्ण केले. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बांधून त्याने २०१४मध्ये पोलीस शिपाई भरतीत उडी घेतली. २० जून, २०१४च्या वाशीम पोलीस अधीक्षक कार्यालय येथे लागलेल्या अंतिम गुणवत्ता यादीत तो ओबीसीतून (इतर मागासवर्गीय प्रवर्ग) १७६ गुणांसह प्रतीक्षा यादीत प्रथम क्रमांकावर होता. निवड यादीतील राजेश केशव देवळे याने इतर ठिकाणी नोकरी लागल्याने स्वत:ची निवड रद्द करण्याचा अर्ज केला. त्यामुळे सुर्वे त्या ठिकाणी पात्र ठरला. मात्र, त्याची दखल घेणे कोणी गरजेचे समजले नाही. १५ महिन्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून त्याची पोलीस शिपाईपदी निवड झाल्याचे सांगण्यात आले. उशिरा का होईना प्रशासनाने दखल घेतली म्हणून सुर्वे कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला. वैद्यकीय चाचणी आणि चारित्र्य पडताळणी झाली. दोन्हींमध्ये पात्र असतानाही नियुक्ती मिळाली नाही. याच काळात अधीक्षक बदलले. नवीन आलेल्या अधीक्षकांनी त्यांना ३० मार्च, २०१६ रोजी पत्र पाठवून प्रतीक्षा यादीचा कालावधी १ वर्षाचा असून, त्यात ३ महिने २८ दिवस उशीर झाल्याचे सांगून नियुक्तीस पात्र नसल्याचे सांगितले. प्रशासनाच्या लाल फितीच्या कारभाराचा आपल्याला फटका का? असा सवाल सुर्वे कुटुंबीय करत आहेत. २०१६ उलटून २०१७ सुरू झाले. मात्र, अजूनही त्याची नियुक्तीसाठीची धडपड सुरू आहे. (प्रतिनिधी)
। अप्पर पोलीस महासंचालकांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात सामान्य प्रशासन विभागाकडूनही अभिप्राय घेण्यात आला. त्या अभिप्रायात ‘सदर कालमर्यादा नियम पोलीस भरतीकरिता लागू होत नाही,’ असे नमूद करण्यात आल्याचे समजते.त्यामुळे ज्या नियमांच्या आधारे मला डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे तो चुकीचा असल्याचे सुर्वेचे म्हणणे आहे. नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. नियुक्तीची स्वप्ने पुन्हा रंगवित असतानाच गृहविभागाच्या अनोख्या न्यायामुळे त्याच्या अडचणीत भर पाडली आहे.न्याय न मिळाल्यास सुर्वेने आत्महत्येचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन याकडे काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते संपर्कात येऊ शकले नाहीत.

Web Title: Appointment for appointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.