पतधोरण समितीवर तीन जणांची नियुक्ती

By admin | Published: September 23, 2016 01:31 AM2016-09-23T01:31:28+5:302016-09-23T01:31:28+5:30

रिझर्व्ह बँकेचे धोरणात्मक व्याजदर काय असावेत, हे ठरविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पतधोरण समितीवर (एमपीसी) सरकारने आज तीन सदस्यांची नेमणूक केली

Appointment of three persons on the Padodhoran Committee | पतधोरण समितीवर तीन जणांची नियुक्ती

पतधोरण समितीवर तीन जणांची नियुक्ती

Next

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे धोरणात्मक व्याजदर काय असावेत, हे ठरविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पतधोरण समितीवर (एमपीसी) सरकारने आज तीन सदस्यांची नेमणूक केली. रिझर्व्ह बँकेच्या नामित सदस्यांसह व्याजदर ठरविण्याचे काम हे सदस्य करतील.
महागाईचा दर ४ टक्क्यांवर ठेवण्याचे उद्दिष्ट सरकारने रिझर्व्ह बँकेला दिले. त्यानुसार, व्याजदर ठरविण्याचे आव्हान समितीसमोर असेल. बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखाली या समितीवर प्रा. चेतन घाटे (भारतीय सांख्यिकी संस्था), पामी दुआ (संचालक, दिल्ली स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स) व प्रा. रवींद्र एच. ढोलकिया (आयआयएम अहमदाबाद) यांच्या नेमणुका सरकारने केल्या
आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Appointment of three persons on the Padodhoran Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.