कुवेतमधील १५ भारतीयांना फाशीऐवजी जन्मठेप, सुषमा स्वराज यांची विनंती मान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 02:47 AM2017-10-01T02:47:44+5:302017-10-01T02:48:01+5:30

कुवेतमधील १५ भारतीयांना देण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करवून घेण्यात भारताला यश आले आहे. त्यांना आता जन्मठेप भोगावी लागणार आहे.

Approval of request of Sushma Swaraj to 15 Indians in Kuwait, life imprisonment instead of death | कुवेतमधील १५ भारतीयांना फाशीऐवजी जन्मठेप, सुषमा स्वराज यांची विनंती मान्य

कुवेतमधील १५ भारतीयांना फाशीऐवजी जन्मठेप, सुषमा स्वराज यांची विनंती मान्य

googlenewsNext

नवी दिल्ली : कुवेतमधील १५ भारतीयांना देण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करवून घेण्यात भारताला यश आले आहे. त्यांना आता जन्मठेप भोगावी लागणार आहे. कुवेतचे राजे सबाह अल सबाह यांनी भारतीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची विनंती मान्य करून, १५ भारतीयांची शिक्षा बदलली.
याखेरीज कुवेतच्या तुरुंगात सध्या ११९ भारतीय नागरिक विविध प्रकारची शिक्षा भोगत आहे. त्यांची शिक्षा कमी करण्याचा निर्णयही कुवेतच्या राजाने घेतला आहे, असे सुषमा स्वराज यांनी ट्विट करून सांगितले. त्यांनीच १५ जणांच्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर केल्याचे नमूद केले आहे. सुषमा स्वराज यांनी या निर्णयाबद्दल राजांचे आभार मानले आहेत.
कुवेतमधील भारतीय दुतावास या सर्व भारतीय नागरिकांच्या संपर्कात असून, त्यांची सुटका होताच, त्यांना सर्व सुविधा दुतावासामार्फत पुरविण्यात येतील, असे स्वराज यांनी म्हटले आहे. अर्थात कोणत्या गुन्ह्यांबद्दल हे भारतीय शिक्षा भोगत आहेत, हे स्पष्ट झालेले नाही.

Web Title: Approval of request of Sushma Swaraj to 15 Indians in Kuwait, life imprisonment instead of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.