आमदारांच्या गावच्या कामाची मान्यता रद्द

By admin | Published: February 29, 2016 10:03 PM2016-02-29T22:03:01+5:302016-02-29T22:03:01+5:30

जळगाव- पाचोरा तालुक्यात अंतुर्ली येथील केटी वेअर बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी नियमबाह्यपणे दिलेली प्रशासकीय मान्यता सोमवारी जि.प. स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी उघड केली. सत्ताधार्‍यांसह काही विरोधी सदस्यांनी या प्रकारास विरोध केला व ही मान्यता रद्द करायला लावली. प्रशासनाने ही मान्यता दबावामुळे द्यावी लागली. नियमबाह्य काम करण्याचा कुठलाही प्रयत्न नव्हता, असे स्पष्टीकरण देत नियमानुसार यासंदर्भात कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.

The approval of the work of the MLA's village is canceled | आमदारांच्या गावच्या कामाची मान्यता रद्द

आमदारांच्या गावच्या कामाची मान्यता रद्द

Next
गाव- पाचोरा तालुक्यात अंतुर्ली येथील केटी वेअर बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी नियमबाह्यपणे दिलेली प्रशासकीय मान्यता सोमवारी जि.प. स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी उघड केली. सत्ताधार्‍यांसह काही विरोधी सदस्यांनी या प्रकारास विरोध केला व ही मान्यता रद्द करायला लावली. प्रशासनाने ही मान्यता दबावामुळे द्यावी लागली. नियमबाह्य काम करण्याचा कुठलाही प्रयत्न नव्हता, असे स्पष्टीकरण देत नियमानुसार यासंदर्भात कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.
दुपारी साने गुरुजी सभागृहात ही सभा झाली. अध्यक्षस्थानी प्रयाग कोळी होत्या. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, सभापती दर्शना घोडेस्वार, नीता चव्हाण, मीना पाटील, सुरेश धनके, सदस्य अशोक कांडेलकर, प्रभाकर सोनवणे, प्रकाश सोमवंशी, राजेंद्र चौधरी, ॲड.व्ही.आर.पाटील, सीईओ आस्तिककुमार पांडेय व इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
काम होते तारखेड्याचे, मंजुरी अंतुर्लीला
तारखेडा ता.पाचोरा येथील केटी वेअरच्या दुरुस्तीसंबंधीचा प्रस्ताव आला होता. त्यास मंजुरी देऊन सुमारे सात लाख रुपये खर्चाची तरतूद करून प्रशासकीय मान्यता द्यायची होती. परंतु तारखेडाचे काम वगळून ऐववेळी आमदार किशोर पाटील यांचे मूळ गाव असलेल्या अंतुर्लीचे काम घेण्यात आले. त्याला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. हा प्रकार नियमबाह्य असून, अधिकारी कुणाच्या इंटरेस्टने काम करतात, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.

अधिकार्‍यांनी दबाव असल्याचे केले कबूल
अंतुर्लीचे काम घेऊन त्याला प्रशासकीय मान्यता देण्यासंबंधी आपल्यावर दबाव होता, असे स्पष्टीकरण जि.प.च्या लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता प्र.नाईक यांनी दिले. तसेच सदस्यांच्या सूचना लक्षात घेऊन अंतुर्ली येथील कामाची प्रशासकीय मान्यता रद्द करून तारखेडाचे काम घेऊ, असे स्पष्टीकरणही प्रशासनाने दिले. प्रशासन या प्रकरणात नियम लक्षात घेऊन काम करील, असेही सांगण्यात आले.

ग्रा.पं.मध्ये स्फोटके ठेवण्याचा ठराव रद्द, सदस्यांवर कारवाईचा निर्णय
कनाशी ता.भडगाव येथील ग्रा.पं.मध्ये विहिरी खोदण्यासाठी आवश्यक स्फोटके ठेवण्याचा ठराव झाला होता. स्फोटके सभेत ठेवता येत नाहीत. ज्या सदस्यांनी हा ठराव केला त्यांना अपात्र करण्याचा व ग्रामसेवकावर कारवाईचा ठराव सभेत झाला. सदस्या मनीषा नवल पाटील, आशा अशोक वाघ, सुलभा महेंद्र पाटील, सुमनबाई भिल व वर्षा पाटील यांना अपात्र करण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला. या ठरावास सरपंच यांनी विरोध केला, परंतु सदस्यांनी हा ठराव करायला भाग पाडले. तर इतिवृत्तात या ठरावास सरपंच यांनी विरोध केला याचीनोंदग्रामसेवकानेकेलीनाही,असेहीसदस्यांनीसभेतसांगितले.


Web Title: The approval of the work of the MLA's village is canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.