रेल्वेतील भरतीसाठी आले दीड कोटी अर्ज, जागा केवळ ८९ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 04:27 AM2018-03-15T04:27:26+5:302018-03-15T04:27:26+5:30

भारतीय रेल्वेतील ‘क’ आणि ‘क’ वर्गाच्या ८९ हजार पदांसाठी दीड कोटी उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज भरले. अर्ज भरण्याची मुदत ३१ मार्च असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Approximately half of the applications received for the recruitment of the Railways, only 89,000 seats are available | रेल्वेतील भरतीसाठी आले दीड कोटी अर्ज, जागा केवळ ८९ हजार

रेल्वेतील भरतीसाठी आले दीड कोटी अर्ज, जागा केवळ ८९ हजार

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेतील ‘क’ आणि ‘क’ वर्गाच्या ८९ हजार पदांसाठी दीड कोटी उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज भरले. अर्ज भरण्याची मुदत ३१ मार्च असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
रेल्वेतील वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात या उमेदवारांनी रेल्वे भरती मंडळाकडे प्राथमिक नोंदणी केली आहे. दुसऱ्या टप्प्यात पात्रता छाननी होऊन शुल्क भरल्यानंतर परीक्षेसाठी बसणाºया उमेदवारांची नेमकी संख्या स्पष्ट होईल. रेल्वेत एकाच वेळी केली जाणारी आजवरची ही सर्वात
मोठी नोकरभरती आहे. त्यात ‘क’ वर्गातील २६,५०२ व ‘ड’ वर्गातील ६२,९०७ पदे भरली जायची आहेत. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार उमेदवारांची निवड मुलाखती न घेता फक्त लेखी परीक्षेने केली जाईल. यासाठी आॅनलाइन लेखी परीक्षा एप्रिल किंवा मेमध्ये होण्याची शक्यता आहे.

Web Title: Approximately half of the applications received for the recruitment of the Railways, only 89,000 seats are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.