April Fool 2018ः 1 एप्रिललाच का बनवलं जातं एकमेकांना मूर्ख ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2018 09:10 AM2018-04-01T09:10:21+5:302018-04-01T09:10:21+5:30
1 एप्रिलचा दिवस उजाडल्यानंतर अनेकांच्या व्हॉट्सअॅपवर एप्रिल फूलचे मेसेज पाठवले जातात. अर्थात यात समोरच्याला मूर्ख बनवण्याचा हेतू असतो. परंतु 1 एप्रिललाच मूर्ख बनवण्याची प्रथा कुठून आली हे तुम्हाला माहीत आहे का ?, एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी मूर्ख का बनवलं जातं. तर त्याला कारणही तसंच आहे. एप्रिल फूल बनवण्याची प्रथा ही फ्रान्समधून उदयास आली आहे.
नवी दिल्ली- 1 एप्रिलचा दिवस उजाडल्यानंतर अनेकांच्या व्हॉट्सअॅपवर एप्रिल फूलचे मेसेज पाठवले जातात. अर्थात यात समोरच्याला मूर्ख बनवण्याचा हेतू असतो. परंतु 1 एप्रिललाच मूर्ख बनवण्याची प्रथा कुठून आली हे तुम्हाला माहीत आहे का ?, एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी मूर्ख का बनवलं जातं. तर त्याला कारणही तसंच आहे. एप्रिल फूल बनवण्याची प्रथा ही फ्रान्समधून उदयास आली आहे.
1582मध्ये युरोपियनांना ज्युलियन दिनदर्शिकेऐवजी ग्रेगोरियन दिनदर्शिका वापरण्याचा सल्ला पॉप ग्रेगरी यांनी दिला. परंतु ग्रेगोरियन दिनदर्शिकेत 1 एप्रिलपासून नव्हे, तर 1 जानेवारीपासून नव वर्षाला सुरुवात होत असल्याचं युरोपियनांना समजलं. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार 1 जानेवारीला सुरू होणारे नववर्ष अनेकांच्या पचनी पडले नाही आणि त्यातील काही जणांनी 1 एप्रिललाच नव वर्षाची सुरुवात होत असल्याचं मानण्यास सुरुवात केली.
त्यावर पॉप ग्रेगरी यांनी एक योजना आखली. त्यांनी 1 एप्रिलला नव वर्षं साजरे करणा-यांना एप्रिल फूल म्हणण्यास सुरुवात केली. त्यानंतर याच दिवशी लोक एकमेकांना मूर्खात काढू लागले. कालांतरानं ही प्रथा युरोपमध्येही पसरली. जपान आणि जर्मनीमध्येही एप्रिल फूलचं लोण पसरलं, तसेच एप्रिल फूलची प्रथा स्कॉटलंडमध्ये दोन दिवस साजरी केली जातो. त्यामुळे आता भारतासह इतर देशांतही 1 एप्रिलला फूल(मूर्ख) बनवलं जातं. तर फ्रान्समध्ये 1 एप्रिलच्या दिवसाला ‘फिश डे’ असंही संबोधलं जातं. यादिवशी चिमुरडे कागदी मासे एकमेकांच्या पाठीवर चिटकवून 1 एप्रिलचा दिवस साजरा करतात.