BB Lal: बाबरीच्या खाली खोदून राम मंदिराचे पुरावे आणलेले; आर्किओलॉजिस्ट बी बी लाल यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 07:40 PM2022-09-10T19:40:12+5:302022-09-10T19:41:51+5:30

Archaeologist B B Lal Death: पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मान, सर्वोच्च न्यायालयात भक्कम पुरावे दिले. रामायणाचे अस्तित्वही जगाला करून दिले.

Archaeologist B B Lal, who searched remains of an ancient temple at Ram Mandir site of babri masjid, passes away at 101 | BB Lal: बाबरीच्या खाली खोदून राम मंदिराचे पुरावे आणलेले; आर्किओलॉजिस्ट बी बी लाल यांचे निधन

BB Lal: बाबरीच्या खाली खोदून राम मंदिराचे पुरावे आणलेले; आर्किओलॉजिस्ट बी बी लाल यांचे निधन

googlenewsNext

राम मंदिराच्या अस्तित्वाचे पुरावे आणणारे आणि पद्मश्री विभूषण आर्किओलॉजिस्ट बी बी लाल यांचे निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. शुक्रवारी रात्री दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल यांना श्रद्धांजली वाहिली. 

बीबी लाल हे भारतातील सर्वात ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ मानले जात होते. वयाच्या 100 व्या वर्षीही ते पुरातत्वशास्त्राशी संबंधित संशोधन आणि लेखनात सक्रिय होते. त्यांचे पूर्ण नाव ब्रजबासी लाल होते. बीबी लाल यांचा जन्म 02 मे 1921 रोजी झाशी जिल्ह्यातील बडोरा गावात झाला होता. शिमल्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स स्टडीमधून त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. 

बीबी लाल यांना 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यानंतर 2021 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारही देण्यात आला. बीबी लाल यांनी महाभारत आणि रामायण तसेच सिंधू खोरे आणि कालीबंगन यांच्याशी संबंधित स्थळांवर बरेच काम केले आहे. बीबी लाल हे 1968 ते 1972 या काळात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे संचालक होते. याशिवाय युनेस्कोच्या विविध समित्यांमध्येही त्यांचा सहभाग होता. 1944 मध्ये सर मॉर्टिमर व्हीलर यांनी त्यांना तक्षशिला येथे प्रशिक्षण दिले होते. 

अयोध्येतील बाबरी मशिदीच्या खाली खोदून त्यांनी राम मंदिराचे अवशेष बाहेर काढले होते. तेव्हा ते देशभरात ओळखले जाऊ लागले होते. बीएचयूचे पुरातत्वशास्त्रज्ञ प्रोफेसर ए के नारायण यांनी 60 च्या दशकात अयोध्येत पुरातत्व उत्खननाचे काम सुरू केले. या प्रकल्पाची प्रगती होऊ शकली नाही, म्हणून लाल यांनी खोदकामाचे काम हाती घेतले. राम मंदिराचे अवशेष मिळाल्यावर त्यांनी याची माहिती बीएचयुला दिली. हेच सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराचे भक्कम पुरावे ठरले. 

रामायणही अस्तित्वात होते, लाल यांनीच जगासमोर आणले...
बीबी लाल यांनी 1975-76 पासून अयोध्या, भारद्वाज आश्रम, शृंगवरपुरा, नंदीग्राम आणि चित्रकूट यांसारख्या रामायणाशी संबंधित स्थळांचे उत्खनन करून महत्त्वाचे तथ्य जगासमोर ठेवले. त्यांच्या नावावर 150 हून अधिक संशोधन लेख आहेत. 'राम, हिज हिस्टोरिसिटी, मंदिर आणि सेतू: साहित्य, पुरातत्व आणि इतर विज्ञान' नावाच्या पुस्तकावरूनही ते चर्चे आले होते. 
 

Web Title: Archaeologist B B Lal, who searched remains of an ancient temple at Ram Mandir site of babri masjid, passes away at 101

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.