ए-३२० विमाने सुरक्षित आहेत का? - हायकोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:21 PM2018-03-20T23:21:45+5:302018-03-20T23:21:45+5:30
वापरात असलेली ए-३२० निओ विमाने उड्डाणासाठी किती सुरक्षित आहेत, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश नवी दिल्ली उच्च न्यायालयाने नागरी विमान वाहतूक संचालनालयाला (डीजीसीए) दिले आहेत.
नवी दिल्ली : वापरात असलेली ए-३२० निओ विमाने उड्डाणासाठी किती सुरक्षित आहेत, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश नवी दिल्ली उच्च न्यायालयाने नागरी विमान वाहतूक संचालनालयाला (डीजीसीए) दिले आहेत. मुख्य न्यायमूर्ती गीता मित्तल व न्या. सी हरी शंकर यांच्या खंडपीठाने असेही बजावले की, हे प्रतिज्ञापत्र संयुक्त संचालक दर्जापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याने सादर करू
नये.
ही विमाने वापरणाºया इंडिगो आणि गोएअर किफायतशीर दरात सेवा देतात. ए-३२० निओचे एक विमान १८ मार्च रोजीही मागे घेण्यात आले. याआधीही या बनावटीची काही विमानांवर बंदी आली. याची नेमकी कारणे लोकांसमोर येणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. डीजीसीएनेच आता स्पष्ट सांगावे की, ही विमाने सुरक्षित आहेत.