15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या झेंडा फडकविण्याच्या पद्धतीत 'असे' आहेत बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 04:18 PM2019-08-14T16:18:15+5:302019-08-14T16:22:08+5:30

73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

That Are The Difference Between Flag Hoisting And Unfurling | 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या झेंडा फडकविण्याच्या पद्धतीत 'असे' आहेत बदल

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या झेंडा फडकविण्याच्या पद्धतीत 'असे' आहेत बदल

googlenewsNext

नवी दिल्ली: 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. तसेच आपण दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहन करतो. परंतु 15 ऑगस्टदिनी झेंडा फडकविण्यात आणि 26 जानेवारीला झेंडा फडकविण्यात काही फरक आहेत; हे फरक तुम्हाला माहीतीय का?

झेंडा फडकविण्याची पध्दत:

15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी तिरंगा ध्वजस्तंभावरुन खालुन वर खेचला जातो; त्यानंतर तिरंगा फडकविला जातो. या प्रक्रियेला ध्वजारोहन (Flag Hoisting) असे म्हणतात. तर 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजस्तंभाला गुंडाळलेलाच असतो आणि त्याला फडकविण्यात येतं. त्यामुळे या प्रक्रियेला झेंडा फडकविणे (Flag Unfurling) असे म्हणतात.  

पंतप्रधान आणि राष्ट्रपती:

स्वातंत्र्यदिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात  पंतप्रधानाच्या हस्ते ध्वाजरोहन केले जाते. तर  प्रजासत्ताकदिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज फडकविण्यात येतो.

ठिकाणात फरक:

स्वातंत्र्यदिनी सर्व मुख्य कार्यक्रम लाल किल्यांवर आयोजित केले जातात. तर प्रजासत्ताकदिनी सर्व कार्यक्रम राजपथवर आयोजित केले जातात. 

Web Title: That Are The Difference Between Flag Hoisting And Unfurling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.