श्री श्री रवीशंकर कायद्यापेक्षा मोठे आहेत का ? विरोधकांचा सवाल
By admin | Published: March 11, 2016 12:10 PM2016-03-11T12:10:07+5:302016-03-11T12:11:23+5:30
श्री श्री रवीशंकर कायद्यापेक्षा मोठे आहेत का ? असा सवाल विचारत विरोधकांनी राज्यसभेत सरकारला धारेवर धरलं
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ११ - श्री श्री रवीशंकर कायद्यापेक्षा मोठे आहेत का ? असा सवाल विचारत विरोधकांनी राज्यसभेत सरकारला धारेवर धरलं. राष्ट्रीय हरित लवादाने श्री श्री रवीशंकर यांच्या जागतिक सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाला 5 कोटींचा दंड ठोठावला आहे. रवीशंकर म्हणतात आम्ही दंड भरणार नाही. त्यांना जेलमध्ये पाठवा, ते कायद्यापेक्षा मोठे आहेत का ? असा सवाल जनता दल युनायटेडचे शरद यादव यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.
दिल्लीमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावर महोत्सव आयोजित केल्यामुळे पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल लवादाने ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रवीशंकर यांनी मात्र ‘प्रसंगी कारागृहात जाण्याची माझी तयारी राहील. मात्र, राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) ठोठावलेला एक रुपयाचाही दंड देणार नाही,’असं सांगत निर्णयालाच आव्हान दिलं होतं.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुक्रवारी या कार्यक्रमाचं उद्धाटन होणार आहे.