पदवीधारक आहात? IB मध्ये नोकरीची मोठी संधी; महिन्याचा पगार 1,42,400 रुपये + भत्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 02:15 PM2020-12-28T14:15:32+5:302020-12-28T14:19:12+5:30
Intelligence Bureau jobs: देशाच्या इंटेलिजेंस ब्यूरो (Intelligence Bureau) मध्ये नोकरी चालून आली आहे. गृह मंत्रालयाने (Home Ministry, MHA) यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहेत.
Sarkari Jobs Vacancy: जर तुम्ही देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ, कॉलेजमधून कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. देशाच्या इंटेलिजेंस ब्यूरो (Intelligence Bureau) मध्ये नोकरी चालून आली आहे. गृह मंत्रालयाने (Home Ministry, MHA) यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहेत.
ही भरती असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, ग्रेड-२ (ACIO) च्या पदांसाठी करण्यात येणार आहे. आयबीद्वारे यासाठी एसीआयओ परीक्षा (IB ACIO Exam) घेतली जाईल. या भरतीची माहिती खाली देण्यात येत आहे. याचबरोबर नोटिफिकेशन आणि ऑनलाईन अर्जासाठी डायरेक्ट लिंक खाली देण्यात येत आहेत.
Pune Metro: पुणे मेट्रोमध्ये नोकर भरती; ITI, इंजिनिअर, डिप्लोमाधारकांना मोठी संधी
पदाचे नाव- असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, ग्रेड-२ (ACIO)
एकूण जागा - 2000
आरक्षण-
जनरल - 989
आर्थिक दुर्बल गट - 113
ओबीसी - 417
एससी - 360
एसटी - 121
पे स्केल - भारत सरकारच्या सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे. 44,900 रुपये ते 1,42,400 रुपये प्रति महिना पेस्केल असणार आहे. याशिवाय केंद्रीय भत्ते, विशेष सुरक्षा भत्ते आणि अन्य भत्तेदेखील दिले जाणार आहेत.
LIC मध्ये भरती; विना परिक्षा होणार निवड, 14 लाखांपर्यंतचे पॅकेज
शिक्षणाची अट
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी. कॉम्पुटरची माहिती असावी.
वय - 18 ते 27 वर्षे असायला हवे. आरक्षित वर्गासाठी वयात 5 वर्षांची सूट दिली जाईल.
अर्ज कसा कराल?
या भरतीच्या परिक्षेत बसण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर mha.gov.in किंवा ncs.gov.in वर ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2021 रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 19 डिसेंबरपासून सुरु झाली आहे.
डायरेक्ट लिंक्स
IB ACIO Job Notification 2020 साठी इथे क्लिक करा...
IB ACIO Exam 2020 Apply साठी इथे क्लिक करा...
IDBI Bank Recruitment 2020: इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) मध्ये अधिकारी बनण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आयडीबीआयने (IDBI Bank) स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (Specialist Cadre Officer) पदांसाठी भरती काढली आहे.
पदवीधारकांपासून ते इंजिनिअर आणि सीए शिकलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीची माहिती, नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे.
पदे :
डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड-डी) - 11 पदे
असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड-सी) - 52 पदे
मॅनेजर (ग्रेड-बी) - 62 पदे
असिस्टंट मॅनेजर (ग्रेड-ए) - 09 पदे
एकूण पदांची संख्या - 134
SBI SO Recruitment 2020, Sarkari Naukri Job 2020: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यानुसार स्पेशालिस्ट ऑफिसरच्या रिक्त असलेल्या 452 पदांवर भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. ११ जानेवारीपर्यंत उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकणार आहेत.
बँकेने सर्व विभागातील वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची पहिली प्रिलिम्स परीक्षा फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. याच्या तारखा लवकरच जाहीर करण्य़ात य़ेणार आहेत.
शैक्षणिक अट
मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्टॅटिक्स किंवा गणित किंवा अर्थशास्त्रामध्य़े पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असायला हवी. यामध्ये ६० टक्क्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. MBA, MGDM आणि BTech पदवी असलेल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
मॅनेजर पदासाठी वयोमर्यादा 25 ते 45 वर्षे आहे. डेप्युटी मॅनेजर पदासाठी 21 ते 35 वर्षे आहे. तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी 28 ते 30 वर्षे आहे. इंजिनिअर पदांसाठी 40 वर्षे आहे. यासाठी 23 हजार ते 51 हजार रुपये एवढा पगार दिला जाणार आहे.