तुम्ही चौकशी यंत्रणा आहात का? दिल्ली उच्च न्यायालयाने झी न्यूजला फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 06:32 AM2020-10-21T06:32:01+5:302020-10-21T06:32:10+5:30
नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगल प्रकरणाशी संबंधित गोपनीय जबाब अवाजवी पद्धतीने जाहीर केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने झी ...
नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगल प्रकरणाशी संबंधित गोपनीय जबाब अवाजवी पद्धतीने जाहीर केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने झी न्यूजला सुनावले आहे. तुम्ही काय चौकशी यंत्रणा आहात का, असा सवालही न्यायालयाने झी न्यूजला केला आहे.
दंगल प्रकरणाशी संबंधित जी कागदपत्रे दाखविण्यात आली, त्याला पुरावा म्हणून नगण्य मूल्य असून एखाद्या व्यक्तीचे चित्रण करण्यासाठी हेतुपुरस्सर अवास्तव पद्धतीने या कागदपत्रांचा वापर केल्याचे दिसते, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे. जामिया मिलिया इस्लामियातील विद्यार्थी आसिफ इक्बाल याने यासंदर्भात दिल्ली याचिका दाखल केली आहे.
संबंधित कागदपत्रे प्रसिद्ध करण्यासाठी नव्हती असे सांगतानाच हा प्रकार म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास असल्याचे मत न्या. विभू बाख्रू म्हणाले.
याप्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करून आरोपीने दिलेल्या कथित कबुलीजबाबाचा स्रोत त्यात नमूद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने झी न्यूजला दिले आहेत.