तुम्ही ट्विटरवर आहात का ? रशियात महिला पत्रकाराचा मोदींना अशक्य असा प्रश्न

By admin | Published: June 2, 2017 09:44 AM2017-06-02T09:44:07+5:302017-06-02T10:06:13+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही ट्विटरवर आहात का ? असा अशक्यप्राय प्रश्न विचारुन केलीने स्वत:ची फजिती करुन घेतली आहे

Are you on Twitter? The question of Modi in the media in Russia is impossible | तुम्ही ट्विटरवर आहात का ? रशियात महिला पत्रकाराचा मोदींना अशक्य असा प्रश्न

तुम्ही ट्विटरवर आहात का ? रशियात महिला पत्रकाराचा मोदींना अशक्य असा प्रश्न

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची मुलाखत घ्यायची असेल तर त्याआधी पत्रकाराने चांगला अभ्यास करणं गरजेचं असतं. योग्य तयारी केली नसेल तर अनेकदा सर्वांसमोर फजिती होण्याची शक्यता असते. त्यात समोर एखाद्या देशाचा पंतप्रधान असेल तर मग छोटीशी चूकही महागात पडू शकते. असंच काहीस नॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनीची (एनबीसी) पत्रकार मॅगीन केली हिच्यासोबत झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही ट्विटरवर आहात का ? असा अशक्यप्राय प्रश्न विचारुन केलीने स्वत:ची फजिती करुन घेतली आहे. ट्विटवरकरांनी तर केलीला ट्रोल करत टीका केली आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या स्टेट डिनर पार्टीदरम्यान केलीने दोघांसोबतही संवाद साधला. सेंट पीटर्सबर्ग येथील कोनस्टॅन्टीन पॅलेसमध्ये हा कार्यक्रम होता. यावेळी केलीने सुरुवातीलाच मोदींना भेटताना एक प्रश्न विचारला आणि ट्विटरकर पेटले. त्यांनी केलीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. 
 
तर झालं असं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आयोजित कार्यक्रमासाठी पोहोचले असता केलीने त्यांचं स्वागत केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीचं कौतुक करत ट्विटरवर तिने छत्रीसोबत अपलोड केलेला फोटो आवडला असल्याचं सांगितलं. यावर प्रतिक्रिया देताना केलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही ट्विटरवर आहात का ? असा प्रश्न विचारुन टाकला. आता या प्रश्नावर मोदींकडेही हसण्याव्यतिरिक्त दुसरा काही पर्याय नव्हता. त्यांनी हो म्हणून उत्तर दिलं. पण केलीच्या या प्रश्नामुळे ट्विटरकरांनी मात्र कपाळावर हात मारुन घेतला. 
 

Web Title: Are you on Twitter? The question of Modi in the media in Russia is impossible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.