हेच तर दुखणं आहे, तुम्हाला हिंदी येत नाही आणि मला इंग्रजी; वकील आणि न्यायधीशांची जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 06:33 PM2023-04-27T18:33:09+5:302023-04-27T18:33:38+5:30

वकील आणि न्यायाधीशांमध्ये हिंदी-इंग्रजीवरुन वाद; व्हिडिओ एकदा पाहाच...

arguement-judge-lawyer-over-english-language-in-court-video-viral | हेच तर दुखणं आहे, तुम्हाला हिंदी येत नाही आणि मला इंग्रजी; वकील आणि न्यायधीशांची जुगलबंदी

हेच तर दुखणं आहे, तुम्हाला हिंदी येत नाही आणि मला इंग्रजी; वकील आणि न्यायधीशांची जुगलबंदी

googlenewsNext


कॉर्पोरेट ऑफिसमध्ये इंग्लिश कल्चर सामान्य गोष्ट आहे. पण हळुहळू सरकारी कार्यालयांमध्येही इंग्लिशची सुरुवात होताना दिसत आहे. यामुळे हिंदी किंवा इतर स्थानिक भाषांमध्ये काम करणे कठीण होत आहे. असाच काहीसा प्रकार एका कोर्टात घडला. एका वकिलाने इंग्रजीत याचिका दाखल करण्यास नकार दिला, त्यानंतर त्याचा न्यायाधीशांशी वाद झाला.

या युक्तीवादाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये न्यायाधीश इंग्रजीत म्हणतात की- तुम्ही पुन्हा हिंदीत याचिका दाखल केली. मला हिंदी समजत नाही. यावर वकील म्हणतात - सर, ही एकच तक्रार आहे, मलाही इंग्रजी कळत नाही. न्यायाधीशांनी उत्तर दिले- मी तुमची याचिका फेटाळेल. वकील म्हणाले - सर, रिजेक्ट करणे बेंचच्या हातात आहे. संपूर्ण बेंच हिंदीच्या बाजूने आहे.

त्यावर न्यायाधीश म्हणाले - तुमची केस संपली, मी पुढची केस बोलावत आहे. वकील म्हणतात- साहेब, केस ऐकून पुढे जाण्याचा नियम आहे. ऐकल्याशिवाय पुढे जाण्याचा नियम नाही. आजही पाटणा हायकोर्टात सर्व न्यायाधीश ऐकत आहेत. तुम्ही भाषांतर करायला सांगत आहात. भाषांतर विभाग स्वातंत्र्यापूर्वीपासून येथे आहे. त्यांना पगार मिळते. त्यांच्याकडून अनुवाद करुन घ्या. मी कायद्यानुरुप बोलत आहे. आम्ही खंडपीठाचा आदेश दाखवत आहोत आणि तो विचारात घेऊनच आदेश पारित करावा.

एका वकिलाचा न्यायाधीशांसमोर न घाबरता हिंदी बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लोक वकिलाचे खूप कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले - आपण भारतात राहतो, आपल्याला हिंदी का नकोय. दुसर्‍याने लिहिले - वकील साहेबांनी मन जिंकले. 

Web Title: arguement-judge-lawyer-over-english-language-in-court-video-viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.